नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडण्याचा विचार करत असाल तर मोबाइल ॲपच्या मदतीने डिजिटल सेव्हिंग खाते (Digital Saving Account) अगदी सहज उघडता येऊ शकते. पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांना आयपीपीबी मोबाइल ॲपच्या (IPPB Mobile App) मदतीने बॅलन्स तपासण्यापासून पैशांची ट्रान्सफर आणि इतर काही आर्थिक व्यवहार देखील करु शकतात. याकरता तुम्हाला रांगेत उभारण्याची काहीही गरज नाही. जाणून घ्या कशाप्रकारे उघडलं जातं खात आणि कोणते व्यवहार तुम्ही ऑनलाइन करु शकता.
असे उघडा ऑपद्वारे खातं
– इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
– अर्जदार भारतीय नागरिक असायला हवा
– सर्वात आधी तुम्ही तुमच्या फोनमध्ये IPPB Mobile Banking App डाउनलोड करुन घ्या
– ॲपमध्ये Open Account वर क्लिक करा
– या ठिकाणी तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागेल
– तुम्ही जो मोबाइल क्रमांक इनसर्ट कराल त्यावर आलेला ओटीपी (OTP)त्यामध्ये प्रविष्ट करा
– या माहितीमध्ये तुम्हाला आई-वडिलांचे नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि नॉमिनी इ. माहिती भरावी लागेल
– यानंतर सबमिट वर क्लिक करा
– अशा प्रकारे तुमचे खाते सुरु होईल
जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन KYC करणे आवश्यक
खातेधारकांना त्यांचे खाते सक्रीय ठेवण्यासाठी आणि ते रेग्यूलर सेव्हिंग खात्यामध्ये बदलून घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
या सुविधा मिळतात
पोस्ट ऑफिस ग्राहकांच्या सुविधेसाठी बचत खात्याबरोबरच रेकरिंग डिपॉझिट (RD), पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी अकाऊंट (SSA) या सेवा देखील देते.
डिजिटल पेमेंट करु शकता
जर तुम्ही या स्किम किंवा पोस्टाच्या अन्य कोणत्याही स्कीम घेत असाल तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या मदतीने डिजिटल पेमेंटही करु शकता. तसेच दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठवू शकता.