LIC ग्राहकांसाठी खास सुविधा ! 6 महिन्यांसाठी नाही द्यावा लागणार गृहकर्जाचा EMI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) हाउसिंग फायनान्स या कंपनीने ग्राहकांसाठी एक विशेष सुविधा आणली आहे. जर व्यक्तीने गृहकर्ज घेतले असेल, तर ६ महिन्यांचा EMI द्यावा लागणार नाही. म्हणजेच, कंपनीने आपल्या ग्राहकांचे ६ EMI माफ केले आहेत. गृह वरिष्ठ योजनेंतर्गत कर्ज घेणार्‍या ग्राहकांना कंपनीने गुरुवारी ही सुविधा दिली आहे. पगारदार तसेच पेन्शनधारकांसाठी ही योजना डीफॉल्ट लाभ निवृत्तीवेतन योजना.
(Default Benefit Pension Scheme) पेन्शन स्कीम अंतर्गत येते आहे.

या ईएमआय वर मिळणार सूट?
कंपनी ग्राहकांना ३७, ३८, ७३, ७४, १२१, १२२ व्या ईएमआयवर सवलत देत आहे. ग्राहकांना जेव्हा हे ईएमआय भरायचे असतील तेव्हा त्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

कोण घेऊ शकते कर्ज?
गृह वरिष्ठ ही सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या गृहकर्ज पर्यांयांपैकी चांगली योजना आहे. या योजनेद्वारे कर्ज घेणार्‍याचे वय ६५ वर्षांपर्यंत असू शकते. निवृत्तीवेतनधारकांसाठी ही कंपनीने ‘गृह वरिष्ठ’ योजना जाहीर केले आहे. याद्वारे कर्जाची मुदत ग्राहकाचे वय ८० वर्षे होईपर्यंत किंवा अधिकाधिक ३० वर्षापर्यंत निश्चित करण्यात आली.

६ ईएमआयवर सवलत –
या योजनेद्वारे तयार घरे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ६ ईएमआयची सवलत देण्यात येत आहे. निर्माणाधीन म्हणजेच बांधकाम सुरू असणारी घरे घेणाऱ्यांना देखील या योजनेत काही फायदे दिले आहेत.

किती Sibyl Score आवश्यक?
कंपनीच्या माहितीनुसार सध्या सिबिल स्कोअर ७०० आणि त्यापेक्षा अधिक असणाऱ्या ग्राहकांना १५ कोटी पर्यंतच्या गृहकर्जावर मिळणारा व्याजदर ६.९० टक्के पासून सुरू होईल.

दरम्यान, LIC हाउसिंग फायनान्सचे CEO वाय विश्वनाथ गौड यांनी म्हटले आहे, की गृह वरिष्ठ त्याच्या वैशिष्ट्यांमुळे जुलै २०२० मध्ये तयार केल्यापासून वर येत आहे. कंपनीने तीन हजार कोटी रुपयांची सुमारे १५ हजार कर्जे वितरित केली आहेत. यावेळी ग्राहकांना कंपनीकडून सहा-ईएमआयमध्ये सवलत देण्यात येत आहे.