‘या’ जिल्ह्यात पिकवला जातो सर्वात लांब मुळा ! 6 फुट लांब, 2.5 इंच जाड

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या जौनपुरमध्ये 6 फुट लांबीचा मुळा पिकवला जातो. कधी-कधी लांबी इतकी असते की, माणूससुद्धा त्याच्यापेक्षा उंचीने लहान दिसतो. जाणून घेवूयात या आगळ्या-वेगळ्या पिकाबद्दल…

नेवार प्रजातीचा आहे मुळा
जौनपुर शहर गोमती नदीच्या किनारी वसलेले आहे. गोमती नदीच्या किनार्‍यावर वसलेली सुमारे 10-12 गावे आपल्या भौगोलिक स्थितीमुळे येथे स्पेशल नेवार प्रजातीच्या मुळ्याचे पिक घेतात. 2.5 इंच जाड मुळा केवळ लांबी-रूंदीसाठीच प्रसिद्ध नसून तो खुपच चविष्टसुद्धा आहे. बाजारात मिळणार्‍या इतर मुळ्यापेक्षा याची चव खुपच चांगली आहे.

असे म्हटले जाते की, यापाठीमागे येथील मातीचेदेखील महत्व आहे. शेतकरी नेहमी मुळा पेरण्यापूर्वी तंबाखूचे पिक घेतात. याचा परिणाम सुद्धा मुळ्यावर दिसून येतो.

कदाचित आता दिसणार नाही
जेव्हा तुम्ही जौनपुरच्या मुळ्याबाबत गुगल सर्च कराल, तेव्हा तुम्हाला उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सीएम अखिलेश यादव यांचा फोटो दिसतो. याशिवाय अनेक इतर मोठ्या मुळ्यांची छायाचित्र दिसतील. परंतु, आता स्थिती हळुहळु बदल आहे. जलवायु परिवर्तन आणि शहरातील वाढत्या प्रदुषणाचा परिणाम मुळ्यावर दिसून येत आहे. अगोदर येथील मुळा 15 ते 17 किलो वजनाचा भरत होता. तर आता असे होत नाही. मुळ्याचे वजन घसरून 5 ते 7 किलो झाले आहे. लांबी सुद्धा मागील काही काळापासून कमी झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ज्या मातीत मुळा पिकवला जात होता, तिथे लोकांनी आता घरे उभारली आहेत. यामुळे उत्पादन सुद्धा कमी झाले आहे.