Gold Rate Today : सोन्याला पुन्हा झळाळी, जाणून घ्या आजचे नवे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनंतर सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56 हजार 200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते. यानंतर सोनं अगदी 11 हजार 500 रुपयांनी घसरलं होतं. पण मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.

फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या दरम्यान सोन्याच्या किंमती 43 हजार 700 पर्यंत घसरल्या होत्या. परंतु कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे आणि बाजारातील चढउतारामुळे सोन्याचे भाव पुन्हा वाढत आहे. आज मुंबईतील सोन्याचे दर 48 हजार 840 रुपये प्रतितोळा इतके आहे. गुरुवारी सोने 47 हजार 715 रुपये प्रतितोळा होते. 2-3 दिवसात सोन्याच्या दरांमध्ये साधारण 1500 रुपये प्रतितोळा वाढ झाली आहे.

कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर वाढलेले दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव वाढण्यासाठी अनेक कारणे आहेत. ज्यामुळे पुढील येत्या काही दिवसांत सोन्याचे दर चढेच राहतील. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार 2021 मध्येही सोन्याची किंमत वाढणं अटळ आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. यावर्षी सोन्याची किंमत नवे रेकॉर्ड बनवणार आहे. सोनं प्रतितोळा 63 हजार रुपये पार होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.