दिर्घकाळ रहायचे असेल तरूण तर रोज सेवन करा पपई, ‘ही’ 14 वैशिष्ट्ये जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – पपई एक असे फळ आहे, जे वर्षभर मिळते. प्रत्येक ऋतूमध्ये मिळणार्‍या या फळाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मात्र, अनेक लोक हे कमी प्रमाणात खातात. पपई अनेक आजारांपासून रक्षण करते. याच्या सेवनाने पोटाच्या समस्या दूर होतात, तसेच त्वचा तरूण होते. चेहर्‍यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसू देत नाही. शिवाय केसांसाठी सुद्धा पपई उपयोगी आहे.

हे आहेत पपईचे फायदे

1 कोरडी त्वचा हायड्रेट करतो.
2 यातील अँटीऑक्सिडेंट्स आणि एंजाइम स्किनचा ड्राइनेस मुलायम करण्यात मदत करते.
3 पपईचा गर चेहर्‍याला लावल्याने त्वचा कोमल, चमकदार होते.
4 पपईचे बी अँटी फंगल असल्याने, केसांना लावल्यास कोंडा दूर होतो.
5 पपईत अँटीऑक्सिडेंट भरपूर असल्याने वाढत्या वयाची लक्षणे कमी करतो.
6 पपई त्वचेच्या सुरकुत्या दूर करतो.
7 उन्हाळ्यात पपईचा फेसपॅक लावल्याने टॅनिंग सुद्धा दूर होते.
8 बद्धकोष्ठतेची समस्या मुळापासून दूर होते.
9 पोट साफ आणि चांगले राहते.
10 केसांचे पोषण करते.
11 पपईत व्हिटॅमिन ए असल्याने केस गळणे बंद होते.
12 पपईच्या गराची पेस्ट छोट्या-मोठ्या खरचटण्यावर लाभदायक आहे.
13 जळजळ आणि वेदनांपासून आराम मिळतो.
14 त्वचा निरोगी राहते.