Happy New Year 2021 : नव्या वर्षात कोणत्या राशीला सूट होतील कोणते रंग, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Happy New Year 2021 : कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देता-देता सर्वजण थकले आहेत, अशावेळी नव्या वर्षात असंख्य अपेक्षा व्यक्त करणे स्वाभाविक आहे. ज्योतिषच्या दृष्टीकोनातून पाहिले तर अनेक रंग आपल्यासाठी खुप भाग्यशाली सिद्ध होतात आणि अनेक रंग आपल्यासाठी चांगले ठरत नाहीत. नव्या वर्षाच्या आशा आणि उत्साहात कोणता रंग असेल तुमच्या चंद्र राशीसाठी अतिशय लकी ते ज्योतिषाचार्यांकडून जाणून घेवूयात…

मेष
मेष राशीच्या जातकांचा राशीस्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी लाल, पिवळा, गुलाबी आणि केसरी रंग आपल्या सोबत ठेवला पाहिजे. असे केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल आणि धनसंबंधी समस्या सुद्धा दूर होतील.

वृषभ
वृषभ राशीच्या जातकांचा राशीस्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी सफेद, हिरवा, फिरोजी किंवा सिल्व्हर रंग वापरला पाहिजे. असे केल्याने आपल्याला सुखद वार्ता समजतील. सोबतच कार्यक्षेत्रात यश मिळेल.

मिथुन
मिथुन राशीच्या जाताकांचा राशीस्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांसाठी हिरवा, निळा, जांभळा आणि सी ग्रीन कलर वापरणे खुप शुभ आहे. यामुळे बुद्धी प्रखर होईल. धनप्राप्ती होईल. जीवनात नवीन उर्जा शक्तीचा विकास सुद्धा होईल.

कर्क
कर्क राशीच्या जातकांचा राशीस्वामी चंद्र आहे. या राशीच्या लोकांना सफेद, गुलाबी, क्रीम, लाल किंवा केशरी कलरचा वापर करणे लाभदायक आहे. यामुळे मान-सन्मानात वाढ होईल.

सिंह
सिंह राशीच्या जातकांचा राशीस्वामी सूर्य आहे. या राशीच्या लोकांनी लाल, केसरी, गुलाबी, पिवळा आणि सफेद रंगाचा वापर केल्यास सकारात्मक विचारांममध्ये वाढ होईल. तसेच तुमच्यावर सदैव सूर्यदेवाची कृपा राहील.

कन्या
कन्या राशीच्या जातकांचा राशीस्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी हिरवा, पोपटी, निळा, जांळळा आणि पिवळा रंग वापरावा. असे केल्याने बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. आणि धर्म-कर्माच्या बाबतीत आस्था वाढेल. वातावरण आनंदी राहील.

तुळ
तुळ राशीच्या जाताकांचा राशीस्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी सफेद, फिरोजी, गुलाबी किंवा हलक्या रंगाचा वापर जीवनात केला पाहिजे. असे केल्याने नोकरी पदोन्नती, तसेच धनलाभ होतो.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या जातकांचा राशीस्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी लाल, गुलाबी, सफेद किंवा केसरी रंगाचा वापर नेहमी केला पाहिजे. याच्या शुभ प्रभावाने आपल्यात नवी स्फूर्ती आणि उर्जाशक्ती संचार करू शकते. धनलाभ होईल, तसचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

धनु
धनु राशीच्या जातकांचा राशीस्वामी गुरू आहे. या राशीच्या लोकांना पिवळा, लाल, गुलाबी किंवा केसरी रंग खुप फलदायी आहे. असे केल्याने जीवनात मंगलच मंगल होईल. यश मिळेल.

मकर
मकर राशीच्या जातकांचा राशीस्वामी शनी आहे. या राशीच्या लोकांनी निळा, काळा, आकाशी तसेच सफेद रंग आपल्या जवळ ठेवला पाहिजे. यामुळे जीवनात येणार्‍या अडचणी दूर होतील. करियरमध्ये नव्या संधी प्राप्त होतील.

कुंभ
कुंभ राशीच्या जातकांचा राशीस्वामी शनी आहे. या राशीच्या लोकांनी काळा, निळा, हिरवा आणि सफेद रंग आपल्या जवळ ठेवणे शुभ परिणामात वाढ करेल. अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

मीन
मीन राशीच्या जातकांचा राशीस्वामी गुरू आहे. या राशीच्या लोकांनी पिवळा, केसरी, लाल, सफेद आणि गुलाबी रंग आपल्या जवळ ठेवल्यास जीवनात सकारात्मक उर्जेचा संचार होईल. आत्मविश्वासात वाढ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल.