कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्थायित्व प्रमाणपत्र दिल्याचे मोबदल्यात पाच हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सालय सी.पी.आर. हॉस्पिटलमधील (CPR Hospital) वरिष्ठ लिपिक यांना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Kolhapur ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. कोल्हापूर एसीबीच्या पथकाने (Kolhapur ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.9) केली.
हुसेनबाशा कादरसाब शेख (वय 47 सध्या. रा. बुरुड गल्ली, नागराज मंदिर जवळ, शनिवार पेठ, कोल्हापूर मूळ रा. अ 195 कर्णिकनगर, जिजामाता बागेजवळ सोलापूर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या वरिष्ठ लिपिकाचे (Senior Clerk) नाव आहे. याबाबत 47 वर्षाच्या महिलेने कोल्हापूर एसबीकडे (Kolhapur ACB Trap) तक्रार दिली आहे.
तक्रारदार हे सी.पी.आर. हॉस्पिटल येथे अधि. परिचारिका म्हणून नोकरीस आहेत. त्यांना स्थायित्व प्रमाणपत्राची गरज असल्याने त्यांनी वरिष्ठ लिपिक हुसेनबाशा शेख यांच्याकडे मागणी केली होती. प्रमाणपत्र दिल्याच्या मोबदल्यात हुसेनबाशा शेख यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत कोल्हापूर एसीबीकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, स्थायित्व प्रमाणपत्र दिल्याच्या मोबदल्यात वरिष्ठ लिपिक शेख याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना शेख याला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे (DySP Sardar Nale), पोलीस निरीक्षक नितीन कुंभार
(Police Inspector Nitin Kumhar), पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर
(PSI Sanjeev Bambargekar), पोलीस अंमलदार विकास माने, सुनिल घोसाळकर, सचिन पाटील,
रुपेश माने यांच्या पथकाने केली.
Web Title : Kolhapur ACB Trap | Demand for bribe in return for grant of stability certificate, A senior clerk in a CPR hospital in the net of anti-corruption Kolhapur
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे