Kolhapur Crime News | उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण, माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि API राहुल राऊतला पोलीस कोठडी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime News | कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समूहाचे प्रमुख (Arjuna Group) संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह आत्महत्या (Santosh Shinde Suicide Case) केल्याने खळबळ उडाली आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवून एक कोटी रुपयांची खंडणीसाठी (Extortion) त्रास देणाऱ्या माजी नगरसेविका शुभदा राहुल पाटील Former corporator Shubda Rahul Patil (रा. गिजवणे रोड, गडहिंग्लज) आणि सहायक पोलीस निरीक्षक राहुल श्रीधर राऊत API Rahul Shridhar Patil (रा. निलजी, ता. गडहिंग्लज. सध्या नेमणुक – अमरावती नियंत्रण कक्ष) कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) सोलापूरमधून ताब्यात घेतले. त्यांना (Kolhapur Crime News) न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली.

माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊत यांनी खंडणीसाठी (Extortion) केलेल्या मानसिक छळामुळे शिंदे यांनी टोकाचे पाऊल उचललं. पत्नी आणि मुलासह विष पिऊन संतोष शिंदे यांनी कुटुंबासह आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून (Kolhapur Crime News) ठेवली आहे. सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) नावे असलेल्या पाटील आणि राऊत यांना कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) सोलापूर मधील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले.

माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक राहुल राऊतने संतोष शिंदे यांना एक कोटीच्या खंडणीसाठी त्रास देतानाच त्यांचा मुलगा अर्जुनशी सुद्धा गैरवर्तणूक केली होती. या दोघांसह पुण्यातील दोन उद्योजकांचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये संतोष शिंदे यांनी केला होता. चौघांना आत्महत्येला दोषी ठरवावे, असा उल्लेख शिंदे यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.

दोघांना सोलापुरातून घेतलं ताब्यात

संतोष शिंदे यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेल्या माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊतला कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने सोलापुरातून रविवारी संध्याकाळी ताब्यात घेतले.
ते सोलापूरमधील एका हॉटेलमध्ये लपून बसले होते.
त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या दोघांनी संतोष शिंदे यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे.
या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मात्र या प्रकरणातील पुण्यातील दोघेजण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title :  Kolhapur Crime News | kolhapur crime gadhinglaj santosh shinde case former corporator shubhda patil and api rahul raut five days police custody

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा