कोल्हापूर : कळंबा कारागृहातील 2 कोरोनाबाधित कैद्यांचं पलायन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  आधीच कोरोना विषाणूने घर केलं आहे. अशा परिस्थितीत अनेक घटना समोर येत आहेत. तर कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील २ कोरोना बाधित असलेले कैदी पळाले आहेत. यामुले कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. खुनाच्या गुन्ह्यामध्ये चाचणी अंतर्गत हे २ कैदी होते, या दोन्ही कैद्यांची काही दिवसापूर्वी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यावरून त्यांना ITI गोविंद सेंटरमध्ये ठेवले होते.

अधिक माहितीप्रमाणे, या दोन्ही कैद्यांवर उपचार सुरू होते. तर दोघांनी रात्रीच्या साडेबाराच्या दरम्यान खिडकीचे लोखंडी गज कापून तेथून धूम ठोकला. या प्रकरणावरून रात्रीच जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये नोंद केली आहे. तर हे दोन्ही कोरोनाबाधित कैदी पळून जात असताना बाकी कैद्यांनी आरडाओरडा केला त्याचवेळी कारागृहातील रक्षकाने बॅटरीच्या उजेडाने त्यांचा पाठलाग केला असता परंतु, बंदोबस्तासाठी नेमणूकलेल्या पोलिसांच्या नजरेसमोरून ते दोन्ही कैदी पलायन झाले आहे.