Kolhapur International Convention Centre | कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे काम वर्षभरात पूर्ण करावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : Kolhapur International Convention Centre | कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाच्या (Rajaram Talav) काठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. कोल्हापूर या ऐतिहासीक शहराच्या वैभवात भर घालणारे हे सेंटर वर्षभरात तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. (Kolhapur International Convention Centre)

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar), माजी आमदार चंद्रदीप नरके (Former MLA Chandradeep Narke) , महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर (IAS Nitin Karir), नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा (IAS Rajgopal Deora), एमएसआरडीसीचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार (IAS Radheshyam Mopalwar), कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार (IAS Rahul Ashok Rekhawar) आदी उपस्थित होते. (Kolhapur International Convention Centre)

राजाराम तलावाच्या जवळ तयार होणाऱ्या या कन्व्हेंशन सेंटरमध्ये २००० क्षमतेच ऑडीटेरीअम, बहुउद्देशीय हॉल, कॉन्फरन्स हॉल, आर्ट गॅलरी, ॲम्फीथिएटर आदी सुविधा असणार आहेत. राजाराम तलावामध्ये संगीत कारंजे, लाईट ॲण्ड साऊंड शो ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

स्थानिक आणि परिसरातील कलावंतासाठी आर्ट गॅलरी, ॲम्फीथिएटर हक्काचे व्यासपीठ होणार असून
याठिकाणी शहर आणि परिसरातील छोटे व्यासायिक, उद्योजक यांना विविध विषयांवर प्रदर्शनासाठी केंद्र
उपलब्ध होणार आहे. सेंटर निर्माण करतानाच त्याठिकाणी वृक्षरोपण करून त्याचे सुशोभीकरण करावे.
त्याचबरोबर याभागात येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता पंचतारांकीत हॉटेलसाठी जागा उपलब्ध करून
देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

या सेंटरसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्याचे बांधकाम एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारे सेंटर निर्माण करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथे भारत राखीव बटालियन क्र.३ ला जागा मंजूर करण्याबाबत
बैठक घेण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनीअसा जागेवर जाऊन पाहणी करावी आणि लोकांचे हित
तसेच भारत राखीव बटालीयनसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधांबाबत चर्चा करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Web Title :  Kolhapur International Convention Centre Kolhapur International Convention Center should be completed within a year; Chief Minister Eknath Shinde’s instructions

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

DPDC Meeting Pune | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा ! जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना राबविणार-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Maharashtra Politics News | ‘…तर बावनकुळेंनी बारामतीमधून अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढवावी’, राष्ट्रवादीच्या आमदाराचं खुलं आव्हान

Pune Crime News | सोलापूरचे तोतया पत्रकार हनमे बंधूंनी बडया बिल्डरकडे देखील मागितली होती खंडणी; 50 लाख अन् 2 फ्लॅटची होती डिमांड, जाणून घ्या प्रकरण