Kondhwa Pune Crime News | पुणे : गाडीची लाईट डोळ्यावर चमकल्याने 20 जणांच्या टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kondhwa Pune Crime News | गाडीची लाईट डोळ्यावर चमकल्याच्या किरकोळ कारणावरुन 20 जणांनी मिळून दोघांना कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 5 मे रोजी रात्री महम्मदवाडी (Mohammadwadi Road) परिसरात घडली होती.

https://www.instagram.com/p/C6sgyG4pEf-

महमंदवाडी येथे दोन तरुण कॉफी पिण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या दुचाकीची लाईट समोर असलेल्या
तरुणांच्या डोळ्यावर चमकावली. यातून दोन्ही गटात वादावादी सुरू झाली.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्याच ठिकाणी असलेल्या रस्त्यावर एका गटाने समोरच्या तरुणाला त्याचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण केली. या घटनेमुळे काही वेळासाठी या परिसरात भीतीचे वातावरण होते.

या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून कोंढवा पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 10 ते 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी समीर बाबूलाल शेख, रोहित अवचिते, केविन जेनिफर, युसूफ शेख, मुजम्मिल बागवान या पाच तरुणांना
ताब्यात घेण्यात आले असून तीन दुचाकी देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.
अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane) यांनी दिली.
पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Chandrakant Patil | अजितदादा स्पष्टच म्हणाले, ”चंद्रकांत पाटील ते चुकीचंच बोलले, आम्ही त्यांना सल्ला दिला …बारामतीत आमचे कायकर्ते पाहुन घेतील”

Pune Crime News | पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार, विद्यार्थिनींचे चोरुन व्हिडीओ काढणाऱ्या दोघांवर FIR, विद्यार्थिनीचा समावेश