Ajit Pawar On Chandrakant Patil | अजितदादा स्पष्टच म्हणाले, ”चंद्रकांत पाटील ते चुकीचंच बोलले, आम्ही त्यांना सल्ला दिला …बारामतीत आमचे कायकर्ते पाहुन घेतील”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar On Chandrakant Patil | शरद पवारांचा (Sharad Pawar) पराभव हेच आमचं ध्येय, अशाप्रकारचे वक्तव्य भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्याने त्याचा वाईट परिणाम बारामतीच्या (Baramati Lok Sabha) राजकारणावर झाला होता. शरद पवार गटाने या वक्तव्याचे पुरेपुर भांडवल केले होते. यामुळे अजित पवार अडचणीत सापडले होते. याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.(Ajit Pawar On Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील चुकीचंच बोलले, नंतर आम्हीच त्यांना पुण्यात राहण्याचा सल्ला दिला, बारामतीत आमचे कायकर्ते पाहुन घेतील, असे सांगितल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येऊन शरद पवारांचा पराभव करायचा असल्याचे वक्तव्य केल्यानंतर बारामतीत नाराजी पसरली होती. याबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला काहीही अर्थ नव्हता. वास्तविक सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत असताना शरद पवारांचा पराभव करण्याचा प्रश्न येतोच कुठे?

पण नंतर चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आम्ही त्यांना पुण्यातच राहण्याचा सल्ला दिला.
बारामतीचा प्रचार आमचे कार्यकर्ते बघून घेतील, असे म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी तसे बोलायलाच नको होते. पण ते का बोलून गेले? हे मला माहीत नाही.
चंद्रकांत पाटील जे बोलले, ते चूकच होते. त्यांनी हे बोलायला नको होते, अशी स्पष्ट शब्दात अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार सारखेच आहेत, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते.
यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, शरद पवार कधी कधी संभ्रमावस्था निर्माण करणारी वक्तव्य करतात.
मी उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष जवळून पाहिले आहे. ते आपला पक्ष विलीन करतील असे मला अजिबात वाटत नाही.

अजित पवार पुढे म्हणाले, शरद पवार यांना जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते इतरांना त्या निर्णयात ओढून घेतात.
आपण सर्वसमंतीने सामूहिक निर्णय घेत आहोत, असे चित्र ते निर्माण करतात. पण शरद पवारांना पाहिजे तेच करतात.
फक्त सर्वांना घेऊन चर्चा केल्याचे ते दाखवितात.

शिरूर लोकसभेतही अजित पवार घरातलाच उमेदवार देणार होते, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले होते,
यावर संतप्त प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, रोहितचा अलीकडे थोडा बॅलन्स बिघडला आहे.
तो हल्ली काहीही बडबड करायला लागला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा, आढळरावांनाही दिले आव्हान, ”स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारा…”

Yerawada Pune Crime News | पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Rupali Chakankar | रूपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षांची मागणी

Murlidhar Mohol Kasba Rally | ‘मोदीजींचंच नेतृत्व देशाला भारी’ मुरलीधर मोहोळ यांच्या कसब्यातील प्रचारात घुमली आरोळी