Koo App वर लीक होतोय यूजर्सचा पर्सनल डेटा, चायनीज कनेक्शन सुद्धा आले समोर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशी ट्विटर म्हटले जात असलेले कू अ‍ॅप सध्या खुप चर्चेत आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह अनेक बडे नेते यात सहभागी झाले आहेत. यादरम्यान फ्रेंच सिक्युरिटी रिसर्चरच्या संदर्भाने माहिती मिळाली आहे की, कू अ‍ॅप सुरक्षित नाही आणि यामुळे यूजर्सचा पर्सनल डेटा लीक होत आहे. यामध्ये ई-मेल आयडी, फोन नंबर्स आणि डेट ऑफ बर्थचा समावेश आहे.

फ्रेंच सायबर सिक्युरिटी रिसर्चर रॉबर्ट बापटिस्ट, ज्यांना त्यांच्या ट्विटर अकाऊंटमुळे एलियट अँडरसन नावाने सुद्धा ओळखले जाते, त्यांनी कू वर रिसर्च केला आणि आढळले की हे सुरक्षित नाही. बापटिस्ट यांनी आधार सिस्टममध्ये सुद्धा दोष सांगितल्याने यापूर्वी चर्चेत आले होते.

काल रात्री रॉबर्ट बापटिस्ट यांनी एक ट्विट करून लिहिले की, तुम्ही सांगितल्याने मी 30 मिनिटे नवीन कू अ‍ॅपवर घालवली आहेत. हे अ‍ॅप यूजर्सचा पर्सनल डेटा लीक करत आहे. यामध्ये ईमेल, डेट ऑफ बर्थ, नेम, मॅरिटल स्टेटस आणि जेंडरचा समावेश आहे.

सिक्युरिटी रिसर्चरने याबाबत स्क्रीनशॉट सुद्धा शेयर केले आहेत. स्क्रीनशॉटवरून हे स्पष्ट होते की, अ‍ॅप अनेक प्रकारचा पर्सनल डेटा लीक करत आहे. शंका आहे की, यूजर्सचा डेटा आतापर्यंत लीक झालेला असेल. महत्वाचे म्हणजे काही भारतीय सरकारी विभाग आणि मंत्री सुद्धा या प्लॅटफॉर्मवर दाखल झाले आहेत. अशावेही लिस्टमध्ये त्यांचे नावसुद्धा सहभागी होऊ शकते.

बापटिस्ट यांनी डोमेन Kooapp.com चे Whois रेकॉर्ड सुद्धा शेयर केली आहे. ज्यावरून चीनी कनेक्शन दिसून येते. जे डोमेन डिटेल्स रिसर्चरने शेयर केले आहे तो डोमेनची हिस्टोरिकल ओनरशिपचा भाग आहे. रेकॉर्डवरून समजते की, हे सुमारे चारवर्षापूर्वी क्रिएट केले गेले होते. तेव्हापासून यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. कू अ‍ॅपची लेटेस्ट ओनर Bombinate Technologies प्रायव्हेट लिमिटेड आहे. ही कंपनी 2019 च्या अखेरीस आली होती.

या अ‍ॅपसोबत एक चायनीज कनेक्शन आवश्य आहे. कंपनीत Shunwei ची काही इन्व्हेस्टमेंट आहे. Xiaomi शी संबंधीत, Shunwei एक व्हेंचर कॅपिटल फंड, जो स्टार्टअप्स मध्ये इन्व्हेस्ट करतो. मात्र, कू कंपनी स्वत:ला पूर्णपणे आत्मनिर्भर सांगत आहे आणि कंपनीचे म्हणणे आहे की, Shunwei लवकरच कंपनीच्या बाहेर पडणार आहे, लवकरच आपली भागीदारी विकणार आहे.

सध्या भारत सरकार आणि ट्विटरमध्ये वाद सुरू आहे. शेतकरी आंदोलक आणि समर्थकांची शेकडो अकाऊंट भारत सरकारने ट्विटरला बंद करण्यास सांगितली होती, परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कारण सांगत ट्विटरने सरकारच्या निर्देशांचे पालन केले नाही.

कू अ‍ॅपच्या रियल ट्विटर अकाऊंटबाबत सुद्धा संभ्रम आहे. लोकांना आतापर्यंत वाटत होते की, @kooappofficioal अ‍ॅपचे ऑफिशियल हँडल आहे. मात्र, को-फाऊंडर अप्रमेय राधाकृष्ण यांनी ट्विट करून सांगितले की, ट्विटरवर कू चे ऑफिशियल अकाऊंट @kooindia आहे.