क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना के. जी. युथ फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करून अभिवादन

थेऊर : पोलिसनामा ऑनलाईन – जागतिक पर्यावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे सर्वत्र तापमानात वाढ होत आहे अशावेळी प्रत्येक माणसाने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जबाबदारी उचलली पाहिजे याचाच एक भाग म्हणून थेऊर येथील के जी युथ फाऊंडेशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करुन वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यात देशी जातीची झाडे लावली.

वृक्षारोपनाचा हा कार्यक्रम के जी फाऊंडेशनच्या कार्यालयासमोर पार पडला रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया हवेली तालुका अध्यक्ष व मा.ग्रामपंचायत सदस्य मारुतादादा कांबळे व के जी युथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष व मानव अधिकार व भ्रष्टाचार निर्मुलन संघटन दिल्ली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष खंडू गावडे याच्या हस्ते वृक्षारोपण केले तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष गणेश धुमाळ, मारुती पडळकर, राहुल गायकवाड, श्रीजय कांबळे, दादा गुरव तसेच फाऊंडेशनचे इतर सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

थेऊर येथील या फाऊंडेशन च्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येतात कोरोना महामारीच्या काळात विशेषतः लॉकडाऊन मध्ये गावातील सर्वसामान्य लोकांना धान्य वाटप तसेच आर्थिक मदत करण्यात आली अनेक गरजू नागरिकांना अडचणी सोडविण्यासाठी आर्थिक मदत केली आहे भविष्यातही फाऊंडेशनमार्फत थेऊरगावातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्याठी व शासकीय योजना गावाती नागरिकापर्यंत पोहचण्यासाठी पाठपुरावा करत राहील असा विश्वास मारुती कांबळे व खंडु गावडे यांनी व्यक्त केला.