Kriti Sanon | 20 मॉडेल्स समोर खाल्ला होता खूप ओरडा; दाक्षिणात्य चित्रपटातून सुरुवात करणारी क्रिती सेनॉन आज यशाच्या शिखरावर

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) हिची गणना बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. कोणतेही बॉलीवुडचे कनेक्शन नसताना व फिल्मी बॅकग्राऊंट नसताना तिने या इंडस्ट्रीमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली. पहिल्यांदा दाक्षिणात्य सिनेमांपासून सुरुवात करणाऱ्या क्रितीने बॉलीवुडमध्ये अभिनयाच्या बळावर नाव कमावले आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आज यशाच्या शिखरावर असली तरी तिने इथंपर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत केली आहे. आज क्रितीचा वाढदिवस (Kriti Sanon Birthday) असून त्यानिमित्ताने तिचा सिनेविश्वातील प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया.

अभिनेत्री क्रिती सेनॉन हिचा जन्म 27 जुलै 1990 रोजी राजधानी दिल्ली मध्ये झाला. तिचे वडील प्रोफेशनने सीए (CA) होते तर आई दिल्ली विद्यापीठामध्ये (Delhi University) प्रोफेसर होती. अभिनेत्री क्रिती सेनॉनने इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण (Kriti Sanon Education) पूर्ण केले असले तरी तिला मनोरंजन विश्वाची आवड होती. तिच्या मेहनतीने तिने मनोरंजनविश्वामध्ये ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीला क्रितीने मॉडेलिंग देखील केले आहे. यावेळी घडलेला प्रसंग क्रितीने एकदा मुलाखतीमध्ये शेअर केला होता. तिने तिच्या पहिल्याच रॅम्प वॉकमध्ये काही तरी चूक केली, त्यानंतर क्रितीला 20 मॉडेल्ससमोर खूप ओऱडा बसला. यावर क्रिती रडू लागली. नंतर तिच्या आईने तिला समजावून सांगितले की, या व्यवसायात काम करायचे असेल तर स्वत: ला मजबूत करावे लागेल.

अभिनेत्री क्रिती सेनॉनने पहिल्यांदा दाक्षिणात्य चित्रपटामध्य़े काम करण्यास सुरुवात केली. तिचा पहिला दाक्षिणात्य चित्रपट ‘नेनोक्काडाइन’ (Nenocadine) हा होता. या तेलुगू सिनेमाममध्ये क्रिती सेनॉनने सुपरस्टार महेश बाबू (Superstar Mahesh Babu) सोबत काम केले होते. त्यानंतर तिने बॉलीवुडमध्ये ‘हिरोपंती’ चित्रपटामधून (Heropanti Movie) दमदार पदार्पण केले. या चित्रपटामध्ये तिने अभिनेता टाइगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) काम केले. क्रिती सेनॉनच्या पहिल्याच चित्रपटामध्ये तिचे सर्वत्र कौतुक झाले व क्रितीचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. त्यानंतर अभिनेत्री क्रिती सेनॉन हिची घौडदौड आजतागायत सुरु आहे.

अभिनेत्री क्रिती सेनॉन हिने अनेक हिट चित्रपट (Kriti Sanon Hit Movie) देऊन तिचे पाय या इंडस्ट्रीमध्ये घट्ट रोवले. यानंतर तिने लुक्का छुपी (Lukka Chupi), मीमी (Mimi), दिलवाले (Dilwale), हाऊसफुल 4 (Housefull 4) या हिट चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच राबता (Raabta), बच्चन पांडे (Bachchan Pandey), भेडिया (Bhediya), शेहजादा (Shehzada) या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. काही दिवसांपूर्वी क्रितीचा ‘आदिपुरुष’ सिनेमा (Adipurush Movie) प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. मात्र हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला गेला. आता क्रिती अभिनयाबरोबरच निर्मिती क्षेत्रात देखील काम करणार आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉनने (Kriti Sanon) ब्लू बटरफ्लाय’ (Blue Butterfly) हे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरडी हटवण्यासाठी पुन्हा ब्लॉक,
उद्या (गुरूवारी) ‘या’ वेळेत प्रवास टाळा