Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मृत कुळांच्या वारसांच्या (Kul Kayda) नोंदी नसल्यामुळे अनेकांना जमिनींच्या मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, आता कब्जेदार हक्कांतर्गत या वारसांच्या नोंदी होणार असल्याने त्यांना मालकी हक्क मिळणार आहे, तसेच महसूल नजराणा भरल्यास त्यांना जमिनींची विक्रीसुद्धा (Kul kayda – Land Sell) करता येणार आहे. येत्या आठवडाभरात या नोंदी सुरू होतील. (Kul kayda – Land Sell)

जमिनींची ई-फेरफारप्रणाली सुरू झाल्यानंतर इतर हक्कांमधील कुळांच्या वारसांच्या नोंदी होत नव्हत्या. त्याचे कारण म्हणजे, नोंदी करण्यासाठीची तरतूद सदर प्रणालीत नव्हती. याबाबत कब्जेदार सदराच्या नोंदी करता येतात. मात्र, कुळांच्या वारसांची नोंद करता येत नाही, असे लक्षात आले. कब्जेदार सदरासाठीच्या नोंदी करताना महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांतर्गत ६ क, अर्थात वारसा प्रकरणांची नोंदवही अद्ययावत करावी लागते. त्यानंतर वारसाची नोंद होऊ शकते.
राज्य सरकारला जमाबंदी आयुक्तालयाने एक प्रस्ताव पाठवला होता. त्यात कब्जेदार सदराच्या नोंदी वारस नोंदीनेच करण्याची मुभा द्यावी, असे मत मांडण्यात आले होते. कूळ वहिवाट कायदा आणि महाराष्ट्र जमीन महसूल कायदा याचा अभ्यास केला असता, त्यात कुळांसाठी वारसा प्रकरणांची नोंदवही करावी, असे बंधनकारकही नाही. त्यामुळे वारसांची थेट नोंद करू शकतो.

कुळांच्या या वारस नोंदीनंतर सर्वच लाभ मिळतील.
त्यात जमीन ताब्यात मिळेल, त्यावर बोजा चढविणे, कर्ज घेणे, असे लाभ घेता येतील.
ही जमीन अशा वारसांना थेट विकता येत नाही.
मात्र, कूळकायदा कलम ४३ प्रमाणे सातबारावर नोंद झाल्यानंतर वारसाला मालक होता येईल.
त्यानंतर त्यासाठीचा जमिनीच्या आकाराच्या ४० पट महसूल नजराणा भरून ती विकताही येईल.
ही वारसांच्या नोंदी करण्यातील एक महत्त्वाची पायरी आहे.

Web Title :- Kul kayda – Land Sell | the land can be sold after getting the right of inheritance of ancestral land Kul kayda Land Sell

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | गुंडांच्या टोळक्याने युवकावर कोयत्याने वार करुन घरावर केली दगडफेक, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR

Swara Bhasker | स्वरा भास्करला बॉलिवूडमध्ये ‘या’ कारणामुळे मिळत नाही काम; स्वतःच सांगितले कारण

Shilpa Shetty | विचित्र जीन्समुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल; ‘उर्फी जावेदकडे तुझे कपडे…’