लादेनच्या मुलाने 9/11 हल्ल्यातील विमान अपहरणकर्त्याच्या मुलीशी थाटला संसार

लंडन : वृत्तसंस्था-

दहशदवादी अोसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन याने, अमिरेकेवर 9/11 चा हल्ला करण्यासाठी विमानाचं अपहरण करणाऱ्या मोहम्मद अट्टाच्या मुलीशी संसार थाटल्याचे वृत्त आहे. याबाबत ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियन हमजाने अट्टाच्या मुलीशी विवाह केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
[amazon_link asins=’B01MST0Q4E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d6faa5b7-9989-11e8-bb1b-1d1d949748f8′]
अल कायदाचा प्रमुख अोसामा बिन लादेनचा सात वर्षापूर्वी अमेरिकेच्या कमांडोनी खात्मा केला होता. अट्टा इजिप्तचा नागरिक आणि अमेरिकेतील एअरलाईन्स प्लाईट-11चा पायलट होता. अट्टानेच सर्वात आधी विमानाचं अपहरण करुन अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला होता. या घटनेत विमानातील एकूण 92 प्रवाशांसह जवळपास 1600 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.

ओसामाचा सावत्र भाऊ अहमद आणि हसन अट्टाच्या माध्यमातून मिळालेल्या वृत्तानुसार, हमजा अलकायदामध्ये वरिष्ठ पदावर सक्रिय आहे. लादेनच्या हत्येचा बदला घेणे हा त्याचा मुख्य उद्देश असल्याचेही समोर येत आहे. अमेरिकेच्या सैन्याने 2011मध्ये मे महिन्यात अफगाणिस्तानच्या एबटाबादमधील परिसरात घुसून लादेनला ठार मारलं होतं. लादेन तेथे एका भल्यामोठ्या घरात आपल्या तीन बायकांसोबत राहत होता. या हल्ल्यात लादेनचा भाऊ खालिदही मारला गेला होता.