Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील ६ जणांची इगतपुरीच्या फॉर्म हाऊसमध्ये (Igatpuri Farm House) हत्या करण्यात आली होती. ही कृत्य तिच्याच तिचाच सावत्र पिता परवेझ टाक याने केल्याचे तपासात उघड झाले होते. १४ वर्षापूर्वी घडलेल्या या हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली होती. याच महिन्याच्या सुरूवातीला न्यायालयाने परवेझ टाकला खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

आता मुंबई जिल्हा न्यायालयाने (Mumbai District Court) अभिनेत्री लैला खान आणि तिच्या परिवाराच्या हत्येप्रकरणी
परवेझ टाक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील पंकज चव्हाण यांनी या प्रकरणाचे दुर्मिळातील दुर्मिळ असे वर्णन केले होते. तसेच दोषी परवेझला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. परवेझने एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.(Laila Khan Murder Case)

२०११ मध्ये मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात ६ जण बेपत्ता झाल्याची तक्रार लैलाचे वडील नादिर पटेल यांनी दाखल
केली होती. यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. अनेक महिने हा प्रकार उघड झाला नव्हता.
जुलै २०१२ मध्ये पोलिसांना इगतपुरीत फॉर्म हाऊसमध्ये सहा व्यक्तींचे सापळे सापडले.
त्यानंतर ऑक्टोंबर २०१२ मध्ये लैला खान खून प्रकरणात आरोपपत्र दाखल केले.
या प्रकरणातील दुसरा आरोपी शकीर हुसैन अजूनही फरार आहे.

फेब्रुवारी २०११ मध्ये लैला, तिची आई आणि चार भावंडांची हत्या परवेझ टाक याने केली होती, त्यानंतर त्यांचे मृतदेह
फार्म हाऊसमध्ये पुरले होते. पोलिसांच्या चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | अल्पवयीन मुलाचा कथित व्हिडीओ व्हायरल, आई शिवानी अगरवाल यांनी समाजमाध्यमांसमोर येऊन दिले स्पष्टीकरण (Video)

CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : आतापर्यंतच्या कारवाईची पोलीस आयुक्तांनी दिली माहिती, गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला, चौकशीत समोर आले

Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातात बिल्डर विशाल अग्रवाल आणि आरोपी मुलाचा नवा दावा, ”अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता”