Latur Crime News | पोलीस ठाण्यात अधंश्रद्धेचा धक्कादायक प्रकार, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी चक्क बोकडाचा बळी; बिर्याणीही बनवून खाल्ली

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Latur Crime News | राज्यामध्ये दिवसेंदिवस गंभीर गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणारे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, लातुर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील (Udgir Rural Police Station) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हद्दीतील गंभीर गुन्हे कमी व्हावेत यासाठी पोलिसांनी चक्क एका बोकडाचा बळी दिला आहे. पोलीस ठाण्याच्या गेटवर बोकडाचा बळी देऊन शांती केल्याचा खळबळजन प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे याचा एक फोटो देखील समोर आला आहे. पोलिसांच्या या अंधश्रद्धेची चर्चा शहरात जोरदार सुरु आहे. (Latur Crime News)

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी कारभार हाती घेतल्यापासून ठाण्याच्या हद्दीत अपघात आणि गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाययोजना करण्याऐवजी गुन्हे कमी करण्यासाठी बोकडाचा बळी देण्याची भन्नाट कल्पना एका पोलीस अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून बाहेर आली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोकड आणण्याची आणि पुढील विधी पार पाडण्याची जबाबदारी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यावर सोपवली.

पोलीस ठाण्यातील क्रमांक तीनच्या अधिकाऱ्याने तयारी सुरु केली. यातील एका अधिकाऱ्याने एक बोकड आणि त्याला कापण्यासाठी कसाई आणला. बोकडाला पोलीस ठाण्याच्या गेटवर बांधण्यात आले. त्यानंतर कसाई याने पोलीस ठाण्याच्या गेटवरच बोकडाचा बळी दिला. हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करुन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बिर्याणी बनवून मारला ताव

या सर्व प्रकाराला पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांची संमती होती. कारण बोकडाचा बळी देत असताना हे कर्मचारी
त्याचे फोटो काढत होते. त्यानंतर कापलेल्या बोकडाच्या मटणाची बिर्याणी तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बिर्याणीचा कार्यक्रम याच परिसरातील एका फार्म हाऊसवर ठेवण्यात आला होता.
याठिकाणी बिर्याणी तयार करुन पोलिसांनी यावर मस्तपैकी ताव मारल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी सरकार कायदे तयार करत आहे.
या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे.
मात्र कायद्याचे रक्षण करणारेच अंधश्रद्धेचा बाजार मांडत असतील तर न्या मागायचा तरी कोणाकडे असा प्रश्न
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील घटनेवरुन उपस्थित होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon Crime | वाळू माफियांचा उपजिल्हाधिकार्‍यांवर हल्ला ! उपजिल्हाधिकारी गंभीर जखमी, शासकीय वाहन, मोबाईल फोडला

पीडीसीसी बँकेच्या खिडकीचे गज तोडून चोरी ! ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस कार्यालयाची केली नासधूस

ACB Trap On Police | 15 हजारांची लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यासह खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Lonavala Crime | लोणावळ्यात उच्च प्रतीचे विदेशी मद्य जप्त, राज्य उत्पादन विभागाची कारवाई

फेसबुकद्वारे मैत्री करुन तरुणीवर बलात्कार, मुंढवा परिसरातील प्रकार