Pune Lonavala Crime | लोणावळ्यात उच्च प्रतीचे विदेशी मद्य जप्त, राज्य उत्पादन विभागाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lonavala Crime | उच्च प्रतीचे विदेशी मद्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे भरारी पथक क्रमांक एकच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेऊन वाहनासह 23 लाख 15 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.6) लोणावळा शहर हद्दीतील तुंगार्ली येथील गोल्ड व्हॅली रोडवरील द लगुना रिसॉर्टच्या जवळ करण्यात आली आहे. (Maharashtra State Excise Department)

बापु विठ्ठल आहेर व सुनिल रामचंद्र कदम यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. लोणावळा शहर हद्दीत अवैधपणे उच्च प्रतीचे विदेशी मद्य बाळगुन विक्री करण्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती पुणे भरारी पथक क्रमांक एकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तुंगार्ली येथे एक वाहन (एमएच 43 सी सी 9267) अडवून तपासणी केली.पथकाने वाहनाची तपासणी केली असता उच्च प्रतीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या 50 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. पथकाने वाहनासह मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

ही कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक (दक्षता व अंमलबजावणी) प्रसाद सुर्वे,
विभागीय उपायुक्त पुणे विभाग धोमकर, अधीक्षक चरणसिंग राजपुत, उपअधीक्षक सुजित पाटील, उत्तम शिंदे,
एस.बी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक एकचे निरीक्षक देवदत्त पोटे,
बी विभागाचे दुय्यम निरीक्षक बी.एस. घुगे, डी.एस. सुर्यवंशी तसेच जवान सुरज घुले, जयराम काचरा, शाहिन इनामदार,
मुकूंद पोटे, चंद्रकांत नाईक, शरद हांडगर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | कोरोना काळात व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग; व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह मुरलीधर मोहोळ यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी अपडेट ! अभिजीत मानकरला अटक

NCP Crisis | राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला, शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा

पिंपरी : किरकोळ कारणावरुन दोन व्यावसायिकांमध्ये हाणामारी, परस्पर विरोधी गुन्हे दाखल; 5 जणांना अटक

मोबाईल देण्यास नकार दिल्याने मित्राचा महिलेवर चाकुने वार, वाकड परिसरातील प्रकार

Katraj Dairy Playgrounds Reservation | कात्रज डेअरीच्या काही भागावरील मैदानाचे आरक्षण उठविण्यास मनसे, कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे) यांच्यासह स्थानीक नागरिकांनी दर्शविला विरोध