Latur News | पावसाळा सुरू झाल्यानंतरही अहमदपूर तालुका तहानलेलाच, 44 गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

अहमदपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे कोरोना Corona तर दुसरीकडे ऐन पावसाळ्यातही (rainy season)  अहमदपूर Ahmedpur (Latur News) तालुक्यातील 44 गावांना पाणीटंचाईचा (Water scarcity) सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांना Citizen पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संबधित ग्रामपंचायतीच्या Gram Panchayat वतीने पंचायत समिती स्तरावर अधिग्रहनाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी केवळ 8 प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून उर्वरीत मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.

मोदी-ठाकरे, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यासह ‘या’ दिग्गजांच्या भेटीगाठींचा काय आहे अर्थ ? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग

तालुक्यातील (Latur News) 123 गावापैकी 44 गावातील पाणीटंचाईचे 52 प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवले आहेत. त्यातील 8 प्रस्ताव मंजूर झाले असून 17 प्रस्तावावर आदेश देण्यात आले आहेत. अनेक प्रस्ताव पंचायत समिती Panchayat Samiti स्तरावर प्रलंबित आहेत. सदर प्रस्ताव पंचायत समितीने उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे Deputy Collector’s Office वर्ग केले असून जिल्हा पातळीवर प्रस्तावास अद्याप मंजूरी मिळाली नाही. यात वैरागड, काळेगाव, नखटवाडी, कोकणगाव, विळेगाव, खंडाळी, जांब, माकणी, भुतेकरवाडी, अजनी खुर्द, थावर तांडा, चिलगरवाडी, नांदूरा, उमरगा, येल्लादेवी, आसेवाडी, गुंजोटी, मालेगाव, सावरगाव, रोकडा, जोडवाडी, मांडणी, वरवटी, वरवटी तांडा, शैंद्री, सलगरा, परचंडा, कोळवाडी, शेंदरी, खरबवाडी, जोडवाडी, हिप्परगा, कोपदेव, गोताळा, येरमेवाडी, तळेगाव आदी गावांचा समावेश आहे.

READ ALSO THIS :

Pune Traffic News | लॉकडाउनचा अंदाज न आल्याने ‘अनलॉक’ नंतर शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीची ‘कोंडी’; पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईनच्या ‘अनियोजित’ कामांचा वाहनचालकांना फटका

 

Hinjewadi Shivajinagar Metro Route | हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोसाठी महापालिकेला प्रसंगी ‘रोख’ मोबदला देउन भूसंपादन करावे लागणार; प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे