Latur News : शेतीच्या वादातून भावासह जावयाचा खुन

उदगीर : शेतीच्या वादातून उदगीर तालुक्यातील हेर येथे कुर्‍हाड, तलवार, लोखंडी रॉडने मारहाण करुन भाऊ व जावयाचा खुन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आह़े. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.

भाऊ गोविंद जगताप आणि जावई नितीन फावडे अशाी खुन झालेल्यांची नावे आहेत.हेर येथे बालाजी जगताप आणि गोविंद जगताप यांच्यात शेतीवरुन वाद होता. गुरुवारी सकाळी त्यांच्यात यावरुन भांडणे झाली. त्यात बालाजी जगताप, अंकुश जगताप, लहू जगताप, पूजा जगताप, आश्विनी जगताप, फुलाबाई जगताप, सोजरबाई ढगे यांनी संगनमत करुन कुर्‍हाड, तलवार, लोखंडी रॉडने गोविंद जगताप याला बेदम मारहाण केली. त्यावेळी गोविंद जगताप यांचे जावई नितीन फावडे आणि भगवान जगताप हे धावून आले. त्यांनी दुचाकीवरुन जखमी गोविंद जगताप यांना घेऊन जाऊ लागले. हे पाहून त्यांनाही इतरांनी बेदम मारहाण केली. गोविंद जगताप यांना उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे घोषित केली. जखमी नितीन फावडे यांना उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला.

या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी हेर गावाला भेट घेऊन माहिती घेतली. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.