नेत्यांनी मला वेश्यासारखं सादर केलं; गंभीर आरोप करत ट्रान्सजेंडर महिलेची निवडणुकीतून माघार

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था – केरळ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या १४० जागेसाठी ६ एप्रिल २०२१ रोजी मतदान होणार आहे. तर या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे असणारे ट्रान्सजेंडर महिला अनन्या कुमारी अ‍ॅलेक्स यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर त्यांनी माघार घेते वेळी म्हटले, पक्षातील नेत्यांकडून आपल्याला मानसिक यातना दिली गेली, त्यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेत आहोत, असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.

अ‍ॅलेक्स यांनी केरळ येथील ट्रान्सजेंडर लोकांचं प्रतिनिधींत्व करण्यासाठी त्या मैदानात उतरल्या होत्या. खरंतर माझंही एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. असं असताना माझ्यासोबत केल्या जाणाऱ्या अपमानजनक वागणुकीचा विरोध केला असता, पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती, तर त्याचबरोबर वेंगारा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने त्यांची निवड केली होती. असे त्यांनी म्हटले आहे. .

अनन्या कुमारी अ‍ॅलेक्स या केरळमधील पहिल्या ट्रान्सजेंडर रेडिओ जॉकी आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक मेकअप आर्टिस्ट आणि न्यूज अँकर म्हणूनही काम केलं आहे. मात्र, अ‍ॅलेक्स यांनी म्हटले, डीएसजेपी नेत्यांनी आपला मानसिक छळ केला आहे. पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिस्पर्धी आणि LDF सरकारविरूद्ध वक्तव्य करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, पक्षाच्या नेत्यांनी आपला अपमान केला आहे, असा दावा देखील अनन्या कुमारी अ‍ॅलेक्स यांनी केलाय. या दरम्यान, United Democratic Front चा पक्ष इंडियन युनियन मुस्लिम लीगचे पीके कुन्हालीकुट्टी आणि डाव्या लोकशाही आघाडीचे नेते या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. तर प्रचारादरम्यान त्यांना अधिकाधिक पुढे येऊन प्रचार करण्यास सांगितलं होतं. ताईच ते म्हणतात, नेत्याच्या पक्षांनी त्यांना एक वेश्या म्हणून सादर केलं आहे. पक्षाच्या नेत्यांनी तिचा वापर केला आहे. असा आरोपही अनन्या कुमारी अ‍ॅलेक्स यांनी केला आहे.