जाणून घ्या WhatsApp अन् Signal संदर्भात, तुमच्या सगळया प्रश्नांची उत्तरं नक्की मिळणार !

पोलीसनामा ऑनलाइन टीम (ओंकार खेडेकर) –    8 फेब्रुवारी 2021 पासून ‘WhatsApp’ आपली नवीन policy घेऊनं लागू करीत आहेत ज्यात ते अस म्हंटलेत की जर हि policy तुम्ही agree केली नाहीत तर आम्ही तुमचा WhatsApp अकाउंट delete करून टाकू. नेमकी हि Policy आहे तरी काय? आणि WhatsApp अस का करत आहे? आपल्याला आता WhatsApp वरून Signal या अँप वर शिफ्ट होयला लागणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण समजून घेऊयात.

WhatsApp, Facebook आणि Instagram या तिघांचे मालकी हक्क एकाकडेच आहेत. आणि ते म्हणजे Mark Zuckerberg. आणि हेच Mark Zuckerberg Facebook ला google च्या दृष्टीकोनातून बघत आहेत. जस google च्या अनेक कंपन्या आहेत; google Gmail, maps ,drive, photos तसेच google चे अजून एक अँप आहे आणि ते म्हणजे YouTube . आणि मार्क हे बघत आहेत कि कश्या प्रकारे आपण आपल्या Facebook ला google शी compete करू शकतो आणि या साठीच ते मोठ्या मोठ्या कंपन्यांना acquire करत आहेत.

2009 मध्ये WhatsApp पहिल्यांदा लोकांच्या सेवे साठी या जगात आल. त्या वेळेस msg करणे खूप महाग होते. १ रुपय …. १ msg… मग अश्या परिस्तिथी मध्ये WhatsApp free messaging घेऊन प्रकट झाले. आणि नुसत प्रकट नाही तर privacy घेऊन प्रकट झाल. त्या वेळेस WhatsApp चे charges एका वर्षासाठी फक्त 1 डॉलर होते. पण त्या नंतर 2014 मध्ये फेसबुक ने 19 billion डॉलर्स ला WhatsApp विकत घेतले. फेसबुक हे 70 billion डॉलर्स कमावतं आणि त्या ७० billion मध्ये WhatsApp ची भागीदारी जेवढी पाहिजे तेवढी अजिबात नाही. आणि याच कारणा मुळे WhatsApp नवीन policy घेऊन आले आहे . लोकांना वाटते कि YouTube कडून आपल्याला पैसे मिळतात. पण तसे नाहीय… पैसे YouTube कडून नाही तर google कडून मिळतात. goggle च्या AdSense कडून मिळतात . जाहिरात दिसती YouTube वर पण जाहिरात देणारं आहे google AdSense. आणि असच मार्क झुकेरबर्ग यांना करायचे आहे कि जाहिरात दिसणार फेसबुक वर पण जाहिरात दाखवणाऱ्याला आणणार कुठून… तर WhatsApp वरून. जस YouTube ला google च समर्थन आहे, तसेच यांना फेसबुक ला WhatsApp चे समर्थन द्यायचे आहे.

आपण ही गोष्ट बघतो कि YouTube वर ज्या जाहिराती दिसतात त्या ज्याच्या त्याच्या प्राधान्य नुसार दिसतात. ज्याला ज्याची गरज आहे त्याला तीच जाहिरात दिसणार… पण फेसबुक वर तस नाहीय… कुठल्याही भाषेतील कोणतीही जहिरात कोणालाही कुठेही दिसती . आणि याच गोष्टी साठी फेसबुकने संशोधन सुरु केले ज्यात त्यांच्या हाती अशी गोष्ट लागली कि YouTube ची जाहिरात हि जाहिरात बघणार्याच्या google search history आणि YouTube चा विडिओ टाकताना अपलोडर ने विडिओ च्या डिटेल्स मध्ये लिहिलेल्या गोष्टींवर आधारित असते. आणि याच साठी WhatsApp ने policy बदलली व अस आव्हान केला कि जर ती policy स्वीकारली नाही तर तुमचा WhatsApp account 8 फेब्रुवारी 2021 ला delete केले जाईल . आता या policy मध्ये नक्की आहे तरी काय आणि WhatsApp कशा कशाचा access आपल्या कडून घेणार? policy नुसार WhatsApp आपल्या माइक रेकॉर्डर ची , नेटवर्क connection ची, आणि तुम्ही कोणत्या मोबाइल मधून WhatsApp चा वापर करीत आहात याची माहिती घेणार आहे. तस हि माहिती twitter अगोदर पासूनच घेत आहे. ज्याने ट्विट केलाय त्याच्या ट्विट च्या खाली लिहून येत कि त्यांनी कोणत्या मोबाइल मधून ट्विट केलाय.

आता हीच privacy WhatsApp हे अँप काढून घेणार आहे. याचा फायदा whatsapp ला कसा? तो म्हणजे असा कि समजा तुम्ही WhatsApp, iPhone मधून वापरात असाल तर WhatsApp हि माहिती Facebook ला देणार आणि Facebook ला हे समजणार कि तुम्ही जर iPhone वापरताय तर तुम्ही श्रीमंत आहात. मग जेव्हा तुम्ही फेसबुक वर जाल तेव्हा तुम्हाला जाहिराती या श्रीमंत व्यक्तींना परवडतील अश्या गोष्टींच्याच दाखवणार. जर एखादा व्यक्ती साधा मोबाइल वापरात असेल तर त्याला जाहिराती त्याच्या आर्थिक परिस्तिथी नुसार दाखवण्यात येतील . सोबतच या policy मधून WhatsApp तुमच्या location आणि भाषेचा access घेणार. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेला असताल तर WhatsApp , location च्या आणि भाषेच्या साह्याने तुम्हाला त्या ठिकाणच्या जाहिराती तुमच्या भाषेत दाखवणार. जर तुम्ही तामीळनाडूला फिरायला गेला तर WhatsApp हि माहिती फेसबुक ला देणार आणि फेसबुक तुम्हाला तामिळनाडूच्या च्या जाहिराती तामिळ भाषेत नाही तर मराठी भाषेत दाखवणार. जसे google च्या history वर आधारून YouTube तुम्हाला जाहिराती दाखवते , तसेच WhatsApp च्या डेटा वर आधारून फेसबुक तुम्हाला जाहिराती दाखवणार. तुम्ही जर google वर एखादा मोबाईल किंवा मोबाईल कंपनी विषयी search केले, तर YouTube उघडल्यावर तुम्हाला त्याच मोबाईल ची जाहिरात दिसती यात आश्चर्यचकित होण्याची काही एक गरज नाही.

तुम्ही जर तुमच्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी WhatsApp वर बोलताना चुकून जरी अस म्हणालात कि मला Chinese खाऊशी वाटतंय तर WhatsApp लगीच हा डेटा उचलून फेसबुक ला देणार आणि फेसबुक तुम्हाला जवळच्या restaurants मध्ये मिळणाऱ्या Chinese dishes ची जाहिरात दाखवणार. आणि जर समोरचा व्यक्ती त्याच वेळेस तुम्हाला अस म्हणाला कि त्याला किंवा तिला Chinese नाही बिरयाणी खायचीय तर WhatsApp ते देखील Facebook ला कळवणार व फेसबुक त्यांना त्यानुसार swiggy च्या , zomato च्या व इतर हॉटेल्स मधील बिर्याणीच्या दिशेस ची जाहिराती दाखवणार. आता वारंवार जाहिराती दाखवल्या तर लोक वस्तू खरेदी करणारच. या मुळे कंपन्यांचा फायदा होणार. आधी कंपन्या google ला जाहिरात द्यायचे कारण त्यांना माहित असायचे कि google AdSense हे योग्य व्यक्तीला योग्य जाहिरात दाखवणार पण फेसबुक साधी bike चालवणाऱ्या व्यक्तीला Mercedes कार ची जाहिरात दाखवणार. आणि सर्वात जास्त महत्वाची गोष्ट ज्याचा WhatsApp access घेणार आणि धोकादायक वाटत आहे ती म्हणजे तुमची payment history. यात WhatsApp चं अस म्हणणं आहे कि ते तुमच्या अकाउंट मध्ये किती रुपय आहेत किंवा दुसऱ्या ठिकाणांवरून तुम्हीं कोणाला किती पैसे पाठवलेत, किंवा तुम्हाला कोणी किती पैसे पाठवले हे बघणार नाही तर फक्त तुम्ही WhatsApp payment द्वारे कोणाला किती पैसे पाठवताय याची नोंद ठेवणार. तुमच्या transactions च्या आधारे WhatsApp हे ठरवणार कि तुमची आर्थिक परिस्तिथी काय आहे. आणि त्या परिस्तिथी च्या आधारावर Facebook हे ठरवणार कि तुम्हाला कोणत्या जाहिराती दाखवायच्या.

जर एका महिन्यात तुम्ही फक्त तीन ते चार हजार रुपयांचे transactions करीत असाल तर फेसबुक ला हे कळून जाईल की तुम्ही middle class आहात. तेच जर तुम्ही एका महिन्यात तीन ते चार लाख रुपयांच्या वर transactions करीत असाल तर त्या आधारांवर तुम्हाला महागड्या गोष्टींच्या जाहिराती दाखविल्या जातील. आता आपण येऊ Elon Musk च्या ट्विट कडे. Elon Musk असं म्हणले कि तुम्ही WhatsApp नाही तर signal या app चा वापर करा . Signal नक्की काय आहे? WhatsApp वर तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला message पाठवता तेव्हा तो message थेट त्या व्यक्ती पर्यंत पोहोचत नाही . त्या message चे रूपांतर एका encrypted code मध्ये होते आणि मग पुढे जाऊन तोच message decrypt होतो. Signal हीच कंपनी आहे जी हे encryption आणि decryption बनवते. तर अश्या प्रकारे WhatsApp च्या नव्या policy मुळे नुकसान कोणालाच नाही होणार. झालाच तर फायदा होईल, फेसबुक कंपनीचा व 99% लोकांनी ती policy स्वीकारली देखील असेल.