Sardool Sikander Death : प्रसिद्ध पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांचं निधन ! किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर झाला होता ‘कोरोना’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   प्रसिद्ध पंजाबी गायक सरदूल सिकंदर (Sardool Sikander) यांचं निधन झालं आहे. ते 60 वर्षांचे होते. पंजाबच्या मोहाली हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून सिकंदर आजारी होते. किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्यांना कोरोना (COVID-19) ची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तेव्हा पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यानं चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

गेल्या महिन्यात किडनीत काही अडचण आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान किडीनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती. हे ऑपरेशन यशस्वी झालं होतं. परंतु याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्यावर कोरोनासाठी उपचार केले जात होते.

सरदूल यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अनेक हिट पंजाबी सिनेमात गाणी गायली आहेत. त्यांचा पहिला अल्बम 1980 च्या दशकात आला होता. रोडवेज दी लारी असं या अलबमचं नाव आहे. यानंतर त्यांनी अनेक अलबम केले. 1991 साली आलेल्या त्यांच्या हुस्ना दे मल्को नं जगभरात धमाल केली. याच्या 5.1 मिलियन प्रती विकल्या गेल्या. गाण्यांव्यतिरीक्त त्यांनी काही सिनेमात अभिनय देखील केला आहे. जग्गा डाकू या पंजाबी सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.