सर्वात मोठ्या गुन्हेगाराच्या रूपात ‘हा’ हिरो दिसणार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पोषक वातावरण जिद्द, चिकाटी मनात असेल तर अनेक मोठ्या लोकांसारखे व्यक्तीमत्व तयार होत असतात. जसे की, अशा लोकांचे मार्गदर्शन ‘अलेक्झांडर’, ‘नेपोलियन बोनापार्ट’, ‘चंगेज खान’, यांसारखी जगावर राज्य करणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तीमहत्व त्यांच्यानंतर ही जिवंत राहत असते. असेच एक व्यक्तीमहत्व आहे. ज्याने हॉलिवूडमध्ये आपली दहशत पसरवली होती. तो म्हणजे ‘चाल्स मेन्सन’ याच्या कारकिर्दीवर आधारित ‘वन्स अपॉन टाइम इन हॉलिवूड’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या क्राईमपटात हॉलिवूड सुपरस्टार ‘ब्रॅड पिट’, व ‘लिओनार्देा दी कॅप्रिओ’ झळकणार आहे. ‘लिओनार्देा ने इन्स्ट्राग्राम पोस्टवरून या आगामी प्रकल्पाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

‘चाल्स मेन्सन’ याच्या जिवनाची कथा थोडक्यात जाणून घेऊया
‘किंग ऑफ क्राईम’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘चाल्स मेन्सन’ने या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चाल्स मेन्सन ने १९६०-७० दशकात हॉलिवूडमध्ये खुप दहशत पसरवली होती. तो निरपराध लोकांचे अवयव काढणे हा त्याचा उद्योग होता. इतका तो विचित्र होता. त्याने ३२ हत्या केली होती. त्याच्यावर वराच काळ खटला सुरु होता. तुरुगात त्याने गुन्हेगार तरुणांची टोळी तयार केली होती. तेथूनच त्याची विकृत कारकिर्द सुरु झाली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेतील गुन्हेगारीतील तरुणांना एकत्र करुन त्या टोळीचे फौजेत रुपांतर केले. एकत्र गुन्हेगार आल्यामुळे ते पोलीसांनाही आव्हान देऊ लागले. त्याचवेळी त्यांनी आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी ‘शेरोन टेटे’, ‘रोमन पोलंस्की’ यांरख्या सेलिब्रिटींच्या हत्येचे सत्र सुरु केले. १०७० साली पुन्हा त्याला अटक केले. त्याचा मृत्यू तुरुंगातच २०१७ साली झाला.