थकलेल्या मनाला उभारी देत ‘कोरोना’वर मात करूया : डॉ. हरीश शेट्टी

पुणे : “कोरोना संसर्ग अजुन संपला नाही. त्यामुळे थकलेल्या मनाला उभारी देत नव्या जोमाने महामारीवर मात करायची आहे, असे मत मुंबईचे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी
यांनी दिले.

असोसिएशन ऑफ मेडिकल कंसल्टनस पुणे व नोबल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने “जिंदगी रिवाइण्ड” कार्यक्रमाचे आयोजन अमनोरा क्लब हाऊस येथे केले होते. याप्रसंगी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता, ए.एम.सी.चे अध्यक्ष व नोबल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने, कार्यकारी संचालक डॉ. एच साळे, विलु पूनावाला हॉस्पिटलचे डॉ. आर्या, डॉ. किरण शाह, विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. अदिति कराड, डॉ. चेतन पांडे, कोविड केअर हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित होते. यावेळी कोविड-19वर मात केलेल्या डॉकटरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. दिलीप माने म्हणाले की, आमचे सर्व हॉस्पिटल आणि डॉक्टर असेच कार्यरत राहून लोकानां कोरोना काळात सेवा अखंड देत राहु” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, डॉ. हरीश शेट्टी यांनी इंड मूड एंड मैजिक या विषयातून डॉक्टरांचे मनोबल वाढविले.

डॉ. रोशनी कावले, डॉ.अभय महिन्द्रे आणि डॉ अर्चना पाटिल यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हिमांशु पेंडसे आणि डॉ. अमर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. असोसिएशन ऑफ़ मेडिकल कन्सल्टेंटचे सेक्रेटरी डॉ. चेतन म्हस्के, कोषाध्यक्ष डॉ. साधना धर्माधिकारी, कार्यकारिणी सदस्य डॉ. दीपा पाठक, डॉ. गौतम साळुंखे, डॉ. नागनाथ मस्तुद, डॉ. अनिल लोणकर, डॉ. स्वाती डोळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.