LIC : ‘या’ खास पॉलिसीवर मिळेल FD पेक्षा अधिक व्याज; मुदतीनंतर मिळतील 17 लाखांपेक्षा जास्त, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा निगमने (LIC) आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने विविध प्लॅन्स आणत असते. आताही LIC ने असाच खास एक प्लॅन आणला आहे. बीमा ज्योती असे या प्लॅनचे नाव आहे. यात गुंतवणूक केल्यास बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट स्किमपेक्षाही अधिक व्याज मिळते. तसेच यात गॅरंटेड बोनसचीही व्यवस्था केली आहे. जाणून घ्या एलआयसीची ही खास पॉलिसी.

बीमा ज्योती हा एक नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपेटिंग प्लॅन आहे. यात दरवर्षी एका निश्चित गुंतवणुकीनंतर गॅरंटेड रिटर्न्सची सुविधाही आहे. या प्लॅनमध्ये मॅच्युरिटीनंतर जवळपास 17.5 लाख रुपयेही मिळतात. तसेच हा एक टर्म प्लॅन आहे. या पॉलिसीत प्रत्येक वर्षाच्या शेवटी 1 हजारच्या सम अशुर्डवर 50 रुपयांचे गॅरंटेड बोनस मिळते. एवढेच नाही तर 1 हजारच्या बेसिक सम अशुर्डवर 50 रुपयांची वेगळी गॅरंटीही मिळते. या प्लॅनमध्ये मिनिमम सम अशुर्ड 1 लाख रुपये आहे. यात कुठल्याही प्रकारची मॅक्झिमम लिमिट नाही. ही पॉलिसी 15 ते 20 वर्षांपर्यंत घेता येते. तसेच ही पॉलिसी 15 वर्षांसाठी घेतल्यास प्रीमियम पेइंग टर्म 10 वर्षांचा असेल. पॉलिसीचा अवधी वाढल्यास प्रीमियम पेइंग टर्मदेखील वाढतो. LIC ची ही पॉलिसी ऑनलाईनसुद्धा घेता येते. यासाठी किमान वय 18 वर्ष असणे गरजेचे आहे. तसेच मॅच्युरिटीचे वय जास्तीत जास्त 75 वर्ष एवढे आहे. या पॉलिसीत 5,10 आणि 15 वर्षांसाठी हप्त्याने मॅच्युरिटी आणि डेथ बेनिफिटचे ऑप्शन उपलब्ध आहे. पॉलिसी अवधीच्या तुलनेत 5 वर्ष आधीपर्यंतच प्रीमियम जमा करावे लागते.