LIC Money Back Plan : रोज 160 रुपयांची बचत करून व्हा 23 लाखांचे मालक, 5 वर्षात घेऊ शकता लाभ

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळात ग्राहकांना गुंतवणुकीसाठी अनेक स्कीम आहेत. ज्या स्कीममध्ये गुंतवणूक करून ग्राहक आपल्या भविष्यासाठी चांगली बचत करू शकतो. एलआयसी अशा अनेक पॉलिसी देते ज्या बहुतांश लोकांना पसंत येतात. यापैकी काही पॉलिसीज लाँग टर्म असतात, तर काही शॉर्ट टर्म. जर थोड्याफार गुंतवणुकीतून चांगले रिटर्न मिळवण्याची इच्छा असेल तर यासाठी एलआयसीने एक प्लॅन लाँच केला आहे. ज्याचे नाव एलआयसी न्यू मनी बॅक पॉलिसी आहे.

एलआयसी न्यू मनी बैक पॉलिसी
ही एक नॉन लिंक्ड लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी आहे. जी गॅरंटेड रिटर्न आणि बोनस देते. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये विमा करणार्‍याला प्रत्येक पाच वर्षात मनी बॅक, मॅच्युरिटीत चांगले रिटर्न, सोबतच टॅक्स इन्श्युरन्स बेनिफिट सुद्धा मिळतो.

मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम टॅक्स फ्री
हा प्लॅन घेण्याचे तुमच्याकडे 20 वर्ष आणि 25 वर्ष असे 2 ऑपशन असतील. ही पॉलिसी पूर्णपणे टॅक्स फ्री पॉलिसी आहे. सोबतच तिचे व्याज, प्रीमियम पेमेंट आणि मॅच्युरिटीवर मिळणार्‍या रक्कमेवर कोणताही टॅक्स लागणार नाही. या प्लॅनमध्ये जर तुम्ही 25 वर्षांपर्यंत दररोज 160 रुपये गुंतवले तर 25 वर्षानंतर तुम्हाला 23 लाख रुपये मिळतील.

13 वर्ष ते 50 वर्ष वयाच्या व्यक्तींना लाभ
एलआयसीनुसार, हा प्लॅन 13 ते 50 वर्षापर्यंत वय असलेली कुणीही व्यक्ती घेऊ शकते. प्लॅनमध्ये प्रत्येक पाच वर्षांनी म्हणजे 5 व्या वर्षी, 10 व्या वर्षी, 15 व्या वर्षी, 20 व्या वर्षी 15-20 टक्के मनी बॅक मिळेल. परंतु, हे तेव्हा होईल जेव्हा प्रीमियमची किमान 10 टक्के रक्कम जमा असेल. यासोबतच मॅच्युरिटीवर गुंतवणुकदारांना बोनस दिला जाईल. एकुण 10 लाख रुपयांच्या या प्लॅनमध्ये अ‍ॅक्सिडेंटल डेथचा लाभ सुद्धा मिळेल. मॅच्युरिटी झाल्यानंतर गुंतवणुकदाराला बोनस सुद्धा दिला जाईल.