LIC : दररोज 200 रुपये भरा अन् 28 लाख मिळवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवला जावा आणि त्यातून चांगला परतावा मिळावा या उद्देशाने अनेकजण एलआयसीला (LIC) प्राधान्य देतात. सध्या जर तुम्हीही गुंतवणूक करू इच्छित असाल आणि एलआयसीच्या (LIC) चा एखादा प्लॅन शोधत असाल तर जीवन प्रगती स्कीम (Jeevan Pragati Scheme) ही तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. यात तुम्ही दररोज 200 रुपयांची गुंतवणूक करून 20 वर्षानंतर 28 लाख रुपये कमवू शकता. एवढेच नव्हे तर या पॉलिसीमध्ये 15,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन देखील मिळते. ही एक नॉन लिंक्ड पॉलिसी (Non Linked Policy) असल्याने याचा शेअर मॉर्केटशी (share market) संबंध नाही. या प्लॅनमध्ये कमी काळात गुंतवणूक करून अनेक फायदे मिळवता येतील. LIC | now about lic jeevan pragati scheme in detail

पॉलिसीची वैशिष्ट्ये
पॉलिसीमध्ये दर 5 वर्षांनी रिस्क कव्हर वाढते. सुरुवातीचे 5 वर्ष सम अश्योर्ड तेवढेच राहते. यानंतर 6 व्या वर्षापासून ते 10 वर्षांपर्यंत ही रक्कम 25 टक्क्यांहून 125 टक्के होते. तसेच 11 व्या वर्षापासून 15 व्या वर्षापर्यंत सम इंश्योर्ड 150 टक्के होते. तर 16 व्या वर्षापासून ते 20 व्या वर्षापर्यंत सम इंश्योर्ड बेसिक सम इंश्योर्डचा 200 टक्क्यांपर्यंत वाढते. म्हणजेच तुम्ही 2 लाखांची पॉलिसी घेतली तर पहिल्या 5 वर्षात डेथ बेनिफिटसाठी 2 लाख कव्हरेज, 6 ते 10 वर्षांसाठी 2.50 लाख कव्हरेज, 11 ते 15 वर्षांसाठी कव्हरेज 3 लाख आणि 16 ते 20 वर्षांसाठी 4 लाख कव्हरेज मिळते. म्हणजेच मूळ रक्कम दुप्पट होते. शिवाय याच्या माध्यमातून अपघाती मृत्यू आणि अपंगत्वाचा राइडर उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी जास्त प्रीमियम भरावा लागणार आहे.

या प्लॅनच्या माध्यमातून 15 लाखांची सम अश्योर्ड आणि 200 रुपये गुंतवणूक करून 20 वर्षांनी तुम्हाला 28 लाख रुपये मिळतील. एखाद्याने 30 वर्ष वयात एलआयसी जीवन प्रगती प्लॅनमध्ये (Jeevan Pragati Scheme) प्रीमियम भरणे सुरु केल्यास वर्षाला जवळपास 73,898 रुपयांचा प्रीमियम (Premium) द्यावा लागेल. म्हणजेच एका दिवसाचे 202 रुपये भरावे लागतील. 50 वर्षात तुम्ही जो प्रीमियम भरलाय ती रक्कम, लॉयल्टी बोनस आणि अ‍ॅडिशनल बोनस मिळून 28 लाख होते.

पॉलिसीबद्दल थोडक्यात
1) ही पॉलिसी घेण्यासाठी किमान वय -12 अन् कमाल वय – 45 असावे लागते. मॅक्झिमम मॅच्योरिटी वय – 65
2) प्रीमियम पे मोड: वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक
3) ग्रेस पीरियड 15 ते 30 दिवस
4) पॉलिसी टर्म: 12 ते 20 वर्ष
5) मिनिमम सम अश्योर्ड: 1,50,000
6) मॅक्झिमम सम अश्योर्डला कोणतीच मर्यादा नाही
7) कर्ज सुविधाः 3 वर्षांनंतर
8) तसेच पॉलिसी 3 वर्षानंतर सरेंडर करता येईल
9) पॉलिसी लॅप्स झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत उर्वरित प्रीमियम भरून रिव्हाईव्ह करू शकता.

Web Title :- LIC | now about lic jeevan pragati scheme in detail

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर