LIC च्या ‘या’ पॉलिसीत दरवर्षी 2500 गुंतवा आणि मिळवा 5 लाखांचा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही एलआयसीची (LIC) पॉलिसी घेण्याबद्दल विचार करत असाल तर आज तुम्हाला एका खास पॉलिसीबद्दल सांगणार आहोत. एलआयसीची ही सर्वात लोकप्रिय पॉलिसी असून यामध्ये तुम्हाला मोठा फायदा मिळतो. या योजनेमध्ये तुम्ही दरमहा 2500 हजार रुपये मासिक हप्ता केल्यास तुम्हाला 22 हजार 500 रुपयांचा बोनस मिळतो. याशिवाय ही योजना संपुष्टात आल्यानंतर तुम्हाला 5 लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळते. जाणून घ्या काय आहे पॉलिसी.

जीवन आनंद पॉलिसी

देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या या प्रसिद्ध पॉलिसीचे नाव जीनव आनंद पॉलिसी असे आहे. ही एलआयसीची सर्वात लोकप्रिय पॉलिसी असून यामध्ये तुम्हाला दरवर्षी निश्चित रक्कम मिळते. तसेच तुमच्या पैशाच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी या योजनेत घेतली जाते. त्यामुळे तुम्ही गुंतवलेले पैसे या योजनेत सुरक्षित राहतात.

दरवर्षी मिळतील 22,500 रुपये

या पॉलिसीमध्ये जर एखाद्या व्यक्तीने 35 व्या वर्षी पैसे गुंतवण्यास सुरुवात केली तर त्याला 5 लाख रुपयांच्या विम्यावर दरमहा 2500 रुपये अधिक जीएसटी जमा करावी लागते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरवर्षी 22 हजार 500 रुपयांचा बोनस मिळण्यास सुरुवात होते. ही रक्कम तुम्हाला 20 वर्षे मिळते. याशिवाय ती व्याजासह मिळते. तसेच 10 हजार रुपयांचा अतिरिक्त बोनस देखील मिळतो.

मॅच्युरिटवर 5 लाखांची रक्कम मिळते

या योजनेत पैसे गुंतवल्यास बोनस व्यतिरिक्त मॅच्युरिटीवर तुम्हाला 5 लाखांची रक्कम मिळते. जर तुम्ही 2500 रुपयांच्या हप्त्यापासून सुरुवात केली असेल तर तुम्हाला दरवर्षी 22 हजार 500 रुपयांचा बोनस हप्ता मिळणार आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंतच्या संपूर्ण पॉलिसीवर अतिरिक्त बोनस म्हणून 4.5 लाखांचा बोनस आणि 10 हजार रुपये घेतले आहेत. तर शेवटी तुम्हाला उर्वरित 5 लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे. ज्यासाठी आपण पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली होती. मॅच्युरिटीनंतर 5 मिळतातच शिवाय तुम्ही 4.60 लाखांचा बोनस घेतला आहे. ही पॉलिसी घेण्यासाठी आपण एलआयसीच्या वेबसाईटवर किंवा एलआयसीच्या कोणत्याही एजंटकडून अधिक माहिती घेऊ शकता.

जीवन आनंद पॉलिसीची वैशिष्ट्ये

– या योजनेमध्ये 25 वर्षाच्या कालावधीनंतर परतावा मिळतो
– या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा 18 वर्षे आणि त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
– या पॉलिसीत गुंतवणूक आणि विमा असे दोन्ही फायदे मिळतात
– या पॉलिसीनुसार संबंधित व्यक्तीला किमान एक लाख रुपये मिळण्याची हमी आहे.
– या पॉलिसीत कमाल रक्कमेसाठी कोणतीही मर्यादा नाही
– जीवन आनंद पॉलिसीसाठी 15 ते 35 वर्षे मुदत ठरवण्यात आली आहे.