LIC ची 29 कोटी पॉलिसीधारकांना मोठी भेट ! सुरू केली ‘ही’ नवी सुविधा, ‘पॉलिसी होल्डर्स’ला असा मिळणार फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना एक मोठा दिलासा दिला आहे. आता ग्राहक एलआयसीच्या मॅच्युरिटी पॉलिसी पेमेंटसाठी डॉक्यूमेंट देशभरातील कोणत्याही एलआयसी ब्रँचमध्ये जमा करू शकतात. मात्र, मॅच्युरिटी क्लेमची प्रोसेसिंग मुळ ब्रँचद्वारे होईल. ही माहिती एलआयसीने ट्विट करून दिली आहे.

एलआयसीने म्हटले आहे की, पॉलिसीधारक पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर दावा करण्याचे कागदपत्र देशभरातील आपल्या जवळच्या सर्व एलआयसी ऑफिसमध्ये महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करू शकतात. एलआयसीच्या या घोषणेनंतर त्या पॉलिसी धारकांना मोठा दिलासा मिळेल, ज्यांची पॉलिसी मॅच्युअर झाली आहे.

2 हजारपेक्षा जास्त ब्रँच

एलआयसीची देशभरात 113 डिव्हिजनल ऑफिस, 2,048 ब्रँच आणि 1,526 छोटी कार्यालये आहेत. याशिवाय त्याचे 74 कस्टमर झोन सुद्धा आहेत जिथे पॉलिसीधारकांचे त्यांच्या पॉलिसीच्या मॅच्युरिटी दाव्याचे फॉर्म स्वीकारले जातील. ग्राहक कोणत्याही ब्रँचकडून घेतलेली पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर दावा करण्याचा फॉर्म कुठेही जमा करू शकतील.

चाचणी प्रक्रियेदरम्यान सुविधा प्रभावी

एलआयसीचे म्हणणे आहे की, ही सुविधा सध्या चाचणी म्हणून सुरू असून प्रभावी करण्यात आली आहे. सध्या एलआयसीचे 29 कोटीपेक्षा जास्त पॉलिसीधारक आहेत. विमा क्षेत्रात एलआयसी नंबर वन विश्वासार्ह कंपनी आहे. लोकांना विश्वास आहे की एलआयसीमध्ये गुंतवलेले पैसे कधीही बुडणार नाहीत. एलआयसी सामान्य माणसासाठी विश्वासू विमा कंपनीसह रोजगाराचा पर्याय सुद्धा आहे. अलिकडेच कंपनीने आपली नवी पॉलिसी बचत प्लस लाँच केली. यामध्ये सुरक्षेसह बचतीची सुद्धा सुविधा आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्ष आहे.