Life Certificate | कोण-कोणत्या पद्धतीने जमा करू शकता जिवंत असल्याचा दाखला, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Life Certificate | निवृत्त कर्मचार्‍यांना पेन्शन सुरळीत ठेवण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा करावे लागते. पेन्शनर जिवंत असल्याचा हा पुरावा आहे. हे प्रमाणपत्र दाखल न केल्यास पेन्शन मिळणे बंद होते. लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याबाबत सरकारने विविध सुविधा निर्माण केल्या असून या पद्धती कोणत्या ते जाणून घेवूयात…

या पद्धतीने जमा करू शकता लाइफ सर्टिफिकेट –

1- पेन्शनर पेन्शन डिस्बर्सिंग बँकेत (PDAs) स्वता उपस्थित होऊन लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकतो.

2- पेन्शनरला फिजिकल प्रकारे उपस्थित राहता येत नसेल तर एखाद्या डेजिग्नेटेड ऑफिशियलच्या हस्ताक्षरासह लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागेल. या प्रमाणपत्रावर…

सरकारी गझेटेड ऑफिसर.

इंडियन रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट अंतर्गत नियुक्त केलेले रजिस्ट्रार/सब-रजिस्ट्रार.

सीपीसी (क्रिमिनल प्रोसीजर कोड) अंतर्गत ज्यांना मॅजिस्ट्रेटचे अधिकार मिळाले आहेत.

पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सब-इन्स्पेक्टरपासून वरिष्ठ रँकचे पोलीस अधिकारी.

पोस्टाचे पोस्टमास्टर/विभागीय सब-पोस्टमास्टर/इन्स्पेक्टर.

आरबीआयचे क्लास-1 ऑफिसर.

एसबीआय आणि त्यांच्या सब्सिडियरीचे क्लास-1 आणि ग्रेड 2 ऑफिसर.

जस्टिस ऑफ पीस.

बीडीओ/तहसीलदार/नायब तहसीलदार.

गाव पंचायत प्रमुख, गावाची कार्यकारी समिती.

खासदार/आमदार.

ट्रेझरी ऑफिसरचे यांचे हस्ताक्षर मान्य आहे.

3- पेन्शनर्स घरबसल्या जीवन प्रमाण पोर्टलवर जमा करू शकतात.
आधार नियामकाने पेन्शनर्सची ओळख ठरवण्यासाठी सर्व बॉयोमेट्रिक डिव्हायसेसच्या डिटेल्स दिल्या आहेत.
ज्या पेन्शनर्स आधार नियामकच्या वेबसाईटवर पाहू शकता.

4- मागील वर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये पोस्टमनद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (Digital Life Certificate)जमा करण्याची डोअर स्टेप सर्व्हिस लाँच झाली होती.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक पोस्टमन आणि ग्रामीण पोस्टमनद्वारे ही सुविधा दिली जाते. मोबाइलद्वारे ही सुविधा मिळवण्यासाठी पेन्शनर्सला गुगल प्ले स्टोअरवरून Postinfo App इन्स्टॉल करावे लागते.

5- देशभरात 12 सरकारी बँका अशा आहेत ज्या देशातील 100 प्रमुख शहरात डोअरस्टेप बँकिंगची सुविधा देतात.
त्यांच्या सर्व्हिसेस अंतर्गत लाईफ सर्टिफिकेट सुद्धा जमा करता येते. यासाठी मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट किंवा टोल फ्री नंबरद्वारे बुकिंग केले जाते, नंतर डोअरस्टेप बँकिंग एजंट घरी येऊन पेन्शनर्सला सेवा देतो.
Doorstep Banking (DSB) अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता किंवा बँकांच्या वेबसाइटवर जाऊ शकता किंवा 18001213721, 18001037188 टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकता.

 

 

परदेशात राहणार्‍यांनी असे जमा करावे जीवन प्रमाणपत्र (Life Certificate)

– जर पेन्शनर/फॅमिली पेन्शनर देशाच्या बाहेर असेल तर बँक अधिकारी द्वारे लाईफ सर्टिफिकेटवर सही करण्याच्या स्थितीत व्यक्तिगत प्रकारे बँकेत येण्याची आवश्यकता नाही.

– जर देशाच्या बाहेर राहात असाल तर लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी त्यांच्याद्वारे अधिकृत केलेल्या व्यक्तीला मान्य केले गेले आहे ज्यावर मजिस्ट्रेट, नोटरी, बँकर किंवा भारताच्या डिप्लोमेटिक रिप्रेझेंटेटिव्हचे हस्ताक्षर असेल. अशा स्थितीत व्यक्तीगतप्रकारे सादर होण्याची आवश्यकता नाही.

– परदेशात घरबसल्या सुद्धा ऑनलाइन पद्धतीने जीवन प्रमाण वेबसाइटद्वारे सुद्धा जीवन प्रमाणपत्र जमा करता येऊ शकते.

 

Web Title : Life Certificate | life certificate how to submit the certificate of being alive know the details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

New IT Law | सरकार नवीन IT कायदा आणण्याच्या तयारीत ! बिटकॉइन, गोपनीयतेवर राहिल विशेष लक्ष – रिपोर्ट

Chitra Wagh | ‘महिला आयोगावर रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ बसवू नका’ – चित्रा वाघ

Udayanraje Bhosale |  उदयनराजेंच्या ताफ्यात नव्या BMW 007 ची ‘एन्ट्री’