स्वातंत्र्यानंतर तब्बल ७४ वर्षांनी गरेलपडा गावात पोहोचली वीज

मुंबई: स्वातंत्र्यानंतर भारतने अनेक क्षेत्रात प्रगती विज्ञान-तंत्रज्ञानात तर मोठी झेप घेतली. मात्र आजही देशातील काही ठिकाणे आहेत कि तिथे अजूनही दळणवळणाची, पाण्याची किंबहूना मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. अशाच शहापूर तालुक्यातील गरेलपडा गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७४ वर्षांनी वीज पोहोचली. गावात वीज पोहोचल्याने ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. गावातील समस्या जाणून शहापूर उपविभागाचे उपकार्यकरी अभियंता अविनाश कटकवार यांच्या उत्तम नियोजनाखाली वीज पोहोचवण्याचं काम केल. त्याबाबदल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

अतिदुर्गम भागात जंगलाने तसेच तानसा तलावाच्या परिसरात व्यापलेल्या गरेलपाडा येथे वीज पोहोचवण्याचे काम अनेक तांत्रिक अडचणीमुळे अनेक वर्षे रखडले होते. मात्र कटकवार यांनी पुढाकार घेत कल्पक बुद्धीने सर्व अडचणी दूर करून विद्युतीकरण करण्यासाठी तीन किलोमीटर एच टी लाईन तसेच १.३५ किलोमीटर एल टी लाईन टाकण्यात आली. त्यामुळे ९० घरांच्या वस्तीला वीज पुरवठा सुरू झाला आहे.

याकामी कल्याण परिमंडळचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, कल्याण मंडळ अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे, कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव रामटेके यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर काम पूर्ण करण्यासाठी शहापूर ग्रामीण विभागाचे सहाय्यक अभियंता सुरज आंबूर्ले व सतिष इलेक्ट्रिकल इंजिनियर्स या एजन्सीने विशेष मेहनत घेतल्याचे कटकवार यांनी सांगितले.