Liquor Prices Increase In Maharashtra | बार, रेस्टॉरंट, क्लबमध्ये मद्य महागणार; राज्य सरकारने व्हॅट ५ टक्के वाढवला

मुंबई : Liquor Prices Increase In Maharashtra | बार, रेस्टॉरंट, क्लबमध्ये मद्य सेवन करऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण राज्य सरकारने (State Government) परमिट रुममध्ये विकल्या जाणाऱ्या मद्यावर ५ टक्के व्हॅट वाढवला आहे. शुक्रवारी याबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे. मात्र, स्टार हॉटेल्समधील मद्याचे दर (Liquor Prices Increase In Maharashtra) वाढणार नाहीत, कारण तेथील व्हॅट आधीपासूनच २० टक्के आहे.

परमिट रुममध्ये विकल्या जाणाऱ्या मद्यावर सरकारने ५ टक्के व्हॅट वाढवल्याने बारचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बार चालकांनी म्हटले आहे की, सरकारने आधीच अबकारी परवाना शुल्क वाढवल्याने व्यावसायावर ताण आला आहे. त्यातच व्हॅट ५ टक्क्यांनी वाढवल्याने मद्याचे दर वाढतील आणि त्याचा व्यावसायावर परिणाम होईल.

बारचालकांनी म्हटले आहे की, एकीकडे पर्यटन आणि महसूलवाढीसाठी सर्व राज्यांमध्ये स्पर्धा आहे.
अशावेळी महाराष्ट्र सरकारने व्हॅटमध्ये वाढ केल्याने उद्दिष्टांना धक्का पोहोचणार आहे.
(Liquor Prices Increase In Maharashtra)

पश्चिम भारत हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचे प्रमुख प्रदीप शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, व्हॅटमध्ये वाढ करण्याचा सरकारचा निर्णय अनपेक्षित आहे. आधीच अबकारी परवाना शुल्कात वाढ केली आहे. आता व्हॅटमध्येही वाढ झाल्याने रेस्टॉरंट आणि बारमध्ये मद्याचे दर वाढतील.

प्रदीप शेट्टी यांनी म्हटले की, इतर राज्य स्पर्धा करत आहेत, ते अर्थव्यवस्था चालवण्यामध्ये पर्यटनाची शक्ती
ओळखून उत्पादन शुल्क कमी करत आहेत. गोवा, चंदीगड आणि हरियाणा ही अशी काही उदाहरणे आहेत.

तर आहार संघटनेचे प्रमुख सुकेश शेट्टी यांनी म्हटले की, व्हॅट वाढीच्या सरकारच्या निर्णयाचा रेस्टॉरंटवर मोठा
परिणाम होईल. यामुळे रोजगार निर्मितीवर विपरीत परिणाम होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil on Narayan Rane | नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनोज जरांगेचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आपले आजोबा-पणजोबा…’