Liquor Sales Rules In Pune | दारू विक्रीच्या नियमांनी पुण्यात तळीरामांची अडचण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Liquor Sales Rules In Pune | पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कार अपघातात (Porsche Car Accident Pune) दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विविध स्तरावून रोष उमटला. या अपघाताला घेऊन आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. (Kalyani Nagar Accident)

त्यामध्ये अल्पवयीन मुलगा, त्यांचे वडील विशाल अगरवाल (Vishal Agarwal Builder), आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल (Surendrakumar Agarwal) आणि पब मालक सह मॅनेजर यांचा समावेश आहे (Pub Owners In Pune). या घटनेनंतर पोलिसांनी आपल्या कारवाईला वेग दिल्याचे दिसत आहे.(Liquor Sales Rules In Pune)

अनेक अनधिकृत पब जमीनदोस्त करण्यात आले. आता पुण्यात जवळपास सगळ्याच मद्य विक्रीच्या दुकानावर पाटी लावत महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार दारू विक्रीचे नियम व अटी त्यामध्ये देण्यात आल्या आहेत.

यामध्ये २१ वर्षाखालील व्यक्तीला दारू दिली जाणार नसल्याचे म्हंटले आहे. तसेच २१ ते २५ वयोगातील व्यक्तींना
सौम्य बिअर विकली जाणार आहे. तर २५ वर्षावरील व्यक्तीला सर्व प्रकारचे मद्य विकले जाणार आहे .
त्यामध्ये व्हिस्की, रम , व्होडका बिअर यांचा समावेश असणार आहे.

याआधी बियर शॉप, वाईन शॉप वाले येईल त्याला दारू विकत होते मात्र अशा कारवाईनंतर जर मद्य घेण्यासाठी
अल्पवयीन मुलगा दिसला तर तुला दारू मिळणार नाही सांगत माघारी पाठवत आहेत.
दारूसाठी मोठ्या व्यक्तीला पाठवून देण्यासाठी सांगत आहेत. त्यामुळे तळीरामांना अडचण निर्माण होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Branch Arrest Dr Ajay Taware | धक्कादायक! अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पलची अदलाबदल, क्राईम ब्रँचकडून ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक