आता शिक्रापूरमध्ये देखील ‘लॉकडाऊन’, 5 दिवस कडक तर पाच दिवस अंशतः Lockdown

शिक्रापुर : शिरुर तालुक्यातील शिक्रापुर परिसरात गेल्या काही दिवसापासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. शिक्रापुर भागात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी दिनांक २० जुलै पहाटे १ पासून ते २४ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत हे पर्यत शिक्रापुर परिसर पुर्णपणे लाॕकडाउन करण्यात येणार आहे.तर २५जुलै ते २९ जुलै दरम्यान अंशतः बंद राहील ,या दरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यत अत्यावश्यक सेवाची दुकाने सुरु राहणार असल्याचे आदेश प्रांत अधिकारी संतोष कुमार देशमुख आदेश यांनी काढले आहेत .त्यामुळे शिक्रापुर परिसर प्रतिबंधित क्षेञ म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

शिक्रापुर परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रातील किराणा दुकाने किरकोळ व ठोक विक्रेते व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने दिनांक २० जुलै पासून ते २९ जुलै पर्यंत संपूर्णतः बंद राहणार आहेत. त्यानंतर २४ जुलै २९ जुलै या कालावधीत सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने व व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू राहतील. इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहणार आहे.

झोमॅटो, स्विगी तत्सम ऑनलाईन वरून मागवले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा पूर्णतः १९ जुलै ते २८ जुलै पर्यंत बंद राहणार आहेत. तसेच सार्वजनिक खाजगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा उद्याने बगीचे हे सर्व बंद राहतील तसेच सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वाक इव्हिनिंग वाक प्रतिबंध करण्यात आला आहे.

उपहार गृह, बार ,लॉज ,हॉटेल्स रिसॉर्ट, बाजार, मार्केट संपुर्णतः बंद राहणार आहे. सर्व केशकर्तनालय सलुन ब्युटी पार्लर दुकानेही बंद राहणार आहेत. सर्व किरकोळ व ठोक विक्री चे ठिकाण आडत भाजीमार्केट फळविक्रेते आठवडे व दैनिक बाजार फेरीवाले हे सर्व ठिकाण २० जुलै ते २४ जुलै पर्यंत पूर्णतः बंद राहतील. तसेच २५ जुलै ते २९ जुलै या कालावधीत किरकोळ विक्री चे ठिकाणे भाजी मार्केट ,फळविक्रेते, दैनिक बाजार या कालावधीत सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत चालू राहणार आहे.

मटन चिकन अंडी मासे इत्यादी विक्री २० जुलै ते २४ जुलै संपूर्ण बंद तर २५जुलै ते २९ जुलै या कालावधीत सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या विरुद्ध कोणती ही व्यक्ती संस्था भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करणे तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ यांची कलमे ५१ ते ६० च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यास पात्र राहतील असेही याआदेशात नमुद करण्यात आले आहे..