बॉयफ्रेंडला आधी ठेवले ‘प्रोबेशन’वर; वाचा तरुणीची अनोखी ‘लव्ह स्टोरी’

लंडन : वृत्तसंस्था –  ‘प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं’, ‘प्रेम आंधळं असतं’, असे म्हटले जाते. पण इंग्लंडमधील जोडपे एकमेकांवर प्रेम करत होते मात्र त्यांचं प्रेम आंधळं नव्हतं तर ते प्रेम ‘डोळस’ होतं. एका तरुणीने लॉकडाऊनदरम्यान चक्क बॉयफ्रेंडला ‘प्रोबेशन पिरीअड’वर ठेवले.

तरुणीने याबाबत सांगितले, की गेल्या काही वर्षांपूर्वी मी आणि जॉर्ज टिंडरवर भेटलो होतो. त्यावेळी माझे वय 16 वर्ष होते. आता एप्रिल महिन्यात आम्ही दोघे 6 वे वर्ष साजरा करणार आहोत. आमच्या दोघांचे नाते आणखी मजबूत झाले आहे. आम्ही दोघं एकमेकांपासून खूप दूर होतो. इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी जॉर्ज स्टॅफोर्डशायर येथे गेला होता. त्यानंतर 2 वर्षानंतर मी भूगोलच्या अभ्यासासाठी मॅन्चेस्टर येथे गेले. त्यामुळे विकेंडला भेटणे आमच्यासाठी अवघड झाले होते. जेव्हा आम्ही भेटत होतो तेव्हा मित्रांसोबत मिळून गेम खेळणे आणि जेवायला जात होतो.

तसेच प्रत्येकवेळी एकत्र मिळून शॉपिंग करणे, घरातील सर्व काम मिळून करणे, त्यामुळे जॉर्ज न्यू नॉर्मल लाईफचा हिस्सा बनला होता. त्याच्याशिवाय आता मी जीवन जगण्याचा विचारही करू शकत नाही. आमच्या दोघांमध्ये छोटे-मोठे वाद सुरु असतात. मी घरातून काम करत होते आणि जॉर्जला बाहेर जावे लागत होते. अवघड असूनही आम्ही हे सांभाळले.

याशिवाय ती म्हणाली, लॉकडाऊनमधील 11 महिने गेल्यानंतर आता आम्ही वेगळे होऊ शकत नाही. मी माझे शिक्षण पूर्ण केले आहे. आता मला इथं पार्टटाईम जॉबही मिळाला आहे. आम्ही दोघेही आनंदात आहोत आणि जॉर्जने त्याचा प्रोबेशन पूर्ण केला आहे.