हिरो नंबर- 1 ! आशियातील Top-50 सेलिब्रिटींमध्ये सोनू सूद पहिला

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये (COVID-19 pandemic Lockdown) सतत लोकांची मदत करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) अजूनही चर्चेत आहे. या सकंटकाळात अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांची तो सतत मदत करताना दिसला होता. पडद्यावरील हा खलनायक रिअल लाईफ सुपरहिरो ठरताना दिसला. अनेक गरिबांना, बेरोजगारांना, विद्यार्थ्यांनाही त्यानं मदत केली. आजही तो लोकांची मदत करत आहे. लंडनमधील एका मॅगेझिननं आता सोनूच्या कमाची दखल घेतली आहे. आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींमध्ये सोनू पहिल्या नंबरवर आहे.

लंडनमधील ईस्टर्न आय (Eastern Eye – British Weekly Newspaper) या साप्ताहिकानं आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. यात सोनू सूदचा पहिला नंबर लागला आहे. ज्यांनी आपल्या कामातून समाजात वेगळी ओळख तयार केली आणि लोकांना प्रेरीत केलं अशा सेलिब्रिटींची ही यादी आहे. या यादीत पहिलं स्थान मिळाल्यानंतर सोनूनं आभार मानले आहेत. आपल्या देशातील नागरिकांची मदत करणं हे माझं कर्तव्य आहे हे लॉकडाऊन काळात मला लक्षात आलं असं तो म्हणाला आहे.

इस्टर्न आयचे संपादक असजद नजीर यांनी ही 50 सेलिब्रिटींची यादी तयार केली आहे. सोनू या सन्मानाचा हकदार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. यामागील कारण सागंताना नजीर म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात सोनू सूद एवढं काम कोणत्याच सेलिब्रिटीनं केलेलं नाही. त्यामुळं सोनू सूदच्या कार्याला आमचा सलाम असंही त्यांनी सांगितलं आहे.

सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रोहित शेट्टी डायरेक्टेड सिंबा सिनेमात तो शेवटचा दिसला होता. या सिनेमात रणवीर सिंग आणि सारा अली खान प्रमुख भूमिकेत होते. सोनूनं बॉलिवूडसोबतच अनेक साऊथ इंडियन सिनेमातेही काम केलं आहे.