Lok Sabha Election 2024 | दिवाळीनंतर ‘मास्टरस्ट्रोक’! जातीच्या गणिताचा तोडगा भाजपनं शोधला, यावेळेला मिशन 60

लखनऊ : उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपाचे (BJP) वरिष्ठ नेते कामाला लागले असून बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) आणि राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आज राज्यातील नेत्यांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाश्र्वभूमीवर सरकार आणि संघटनेतील आवश्यक बदलांसंदर्भात चर्चा करू शकतात. बैठकीत जातीय जनगणनेचा तोडगा निघू शकतो. तसेच मिशन ६० टक्के साध्य करण्यावर चर्चा होऊ शकते.

जात आणि धर्माचे राजकारण आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजप दिवाळीनंतर उत्तर प्रदेशात मस्टरस्ट्रोक खेळणार आहे. भाजपने जातीच्या राजकारणाचा तोडगा शोधला असल्याचा दावा केला जात आहे. कारण भाजप दिवाळीनंतर उत्तर प्रदेशात कॅबिनेटचा विस्तार करण्याची शक्यता आहे. याशिवाय, २०२४ च्या निवडणुकीसाठी मिशन ६० सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मिशन ६० म्हणजे ६० टक्के मतदान मिळवणे होय. २०१९ मध्ये हे टार्गेट ५० टक्के होते.

बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा (Party President JP Nadda) यांची भेट घेतली. यावेळी पक्षाच्या मुख्यालयातील बैठकीत कॅबिनेट विस्तार आणि इतरही मुद्द्यांवर सहमती झाली.

योगी दिल्लीहुन परतल्यानंतर आज ते यासंदर्भात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उपमुख्यमंत्री बृजेश पाठक,
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, आदी नेत्यांसोबत बैठक करू शकतात. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी सरकार
आणि संघटनेतील आवश्यक बदलांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election 2024)

या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात एसबीएसपी प्रमुख ओमप्रकाश राजभर आणि सपातून भाजपमध्ये आलेले
दारासिंह चौहान यांच्यासोबत जातीय जनगणनेचा तोडगा निश्चित होऊ शकतो.
तसेच मिशन ६० वर देखील सविस्तर चर्चा होऊ शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On Bhide Wada Smarak | भिडे वाड्यातील भाडेकरूंचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले ! महिन्याभरात वाडा खाली करा अन्यथा पालिकेला भूसंपदानाचे सर्व पर्याय खुले राहतील

Deepak Mankar On Maratha Reservation | ‘मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या’, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र