Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Lok Sabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाने मावळ (Maval) तालुक्यातील सिंहगड, कासुर्डे, शिरगाव व अंबी या ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या ३ ठिकाणांवर दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत छापे मारून ३ गुन्ह्यांची नोंद करून १ लाख ४४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Lok Sabha Election 2024)

या कारवाईत १०५ लिटर तयार गावठी हातभट्टी दारु, ३ हजार ६०० लिटर रसायन व गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचे इतर साहीत्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही अवैध दारु व्यवसायाविरुद्ध अशाच प्रकारच्या मोहिमा आखून सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department Pune) नमूद केले आहे.

या कारवाईत दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्हि.एम. माने, जवान पी. टी. कदम, एस.एस. पोंधे, ए. आर. थोरात,
एस.सी. भाट, आर. टी. तारळकर व महिला जवान यु.आर. वारे यांनी सहभाग घेतला.
गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक व्हि. एम. माने व
दुय्यम निरीक्षक ए.बी. पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Andolak-Ashok Chavan | संतप्त मराठा बांधवांनी अशोक चव्हाणांची गाडी आडवली, जोरदार घोषणाबाजी, अखेर माघारी फिरले

Police Inspector Arrested In Robbery Case | व्यावसायिकाचे दोन कोटी लुटल्याच्या प्रकरणात पोलीस निरीक्षकाला अटक, पोलीस दलात प्रचंड खळबळ