Lokmanya Hospitals | ‘लोकमान्य’मध्ये देशातील पहिली ‘ग्रेड फोर रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सिस्टीम’ दाखल; गुडघा प्रत्यारोपण होणार आणखी सुकर ; डॉ. नरेंद्र वैद्य यांनी केली या यंत्रणेच्या सहाय्याने देशातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे : Lokmanya Hospitals | देशातील पहिली ‘ग्रेड फोर रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सिस्टीम’ (Robotic Knee Replacement Surgery) पुण्यातील नामांकित (Pune News) लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. ‘लोकमान्य’ हे अस्थिरोग विकारातील उपचारांमध्ये जगातील अत्याधुनिक यंत्रणा रुग्णांसाठी उपलब्ध करण्यासाठी भारतामध्ये अग्रेसर असणारे रूग्णालय आहे. (Lokmanya Hospitals)

लोकमान्य हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैद्य (Dr. Narendra Vaidya) यांनी २०१६ मध्ये देशातील पहिली ‘रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी’ यशस्वी केली होती. गेल्या सहा वर्षात दहा हजाराहून अधिक रोबोटिक नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेचा टप्पा डॉ. नरेंद्र वैद्य यांनी यशस्वी केला आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्या रुग्णाच्या आयुष्यात आमूलाग्र बलल होणार असून, त्यांचे आयुष्य अधिक क्रियाशील होऊ शकते. रोबोटीक यंत्रणेमधील जगामधील अत्यंत प्रगत असणारी ‘ग्रेड फोर जनरेशन रोबोटिक सिस्टीम’ लोकमान्य हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आली. डॉ. वैद्य यांनी या यंत्रणेच्या सहाय्याने रुग्णावर देशातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली. (Lokmanya Hospitals)

‘रोबोटिक नी रिप्लेसमेंट’ यंत्रणेचे वैशिष्ट्य –

– रुग्णास कोणत्याही प्रकारचा सिटीस्कॅन अथवा एमआरआय करण्याची गरज नाही (Lokmanya Hospital Pune)

– रेडियेशनचा त्रासही टळतो

– रूग्णाच्या गुडघ्याची रिअल टाईम ईमेज ही सर्जनला स्क्रीनवर उपलब्ध होते

– खराब कुर्चेचे अचूक मॅपिंग करुन तेवढाच भाग काढण्यासाठी सर्जनला मदत

– सर्जरीमध्ये कमालीची अचूकता साधण्यासाठी सक्षम अशी यंत्रणा

– रुग्णाची नैसर्गिक अवयवांची रचना जतन करण्यात यंत्रणेचा बहुमोल उपयोग

– सर्जन फ्रेंडली असल्यामुळे शस्त्रक्रिया करताना सर्जनला सुलभता जाणवते

– शस्त्रक्रियेतील हालचालीमध्ये सुलभता येणे शक्य असल्यामुळे रूग्णाला चालणे, फिरणे, प्रवास करणे, पोहणे, मांडी घालता येणे या क्रिया सुलभ पद्धतीने होतात

चौथ्या जनरेशनची रोबोटिक सिस्टीम असल्यामुळे ही जगातील सद्यस्थितीतील प्रगत यंत्रणा आहे. शस्त्रक्रियेमध्ये येणारी अचूकता, या शस्त्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमीत कमी यामुळे शस्त्रक्रिया नंतर होणारा जंतू संसर्गाचा ही धोका कमी प्रमाणात दिसून येतो. रुग्णाचा हॉस्पिटल मधील अवधीही कमी होऊन रुग्ण हा 72 तासांमध्ये घरीही जाऊ शकतो. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये आणखी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने रुग्णांस याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Web Title :-  Lokmanya Hospitals | India’s first ‘Grade Four Robotic Assisted Knee Replacement System’ filed in ‘Lokmanya’; Knee transplants will be easier

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update