Lonavala News | लोणावळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन; दोन दुकानांना प्रत्येकी 10 हजार रुपये दंड

लोणावळा न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Lonavala News | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही काही जणांकडून या निर्बंधांचे उल्लंघन केले जात आहे. लोणावळा शहर पोलिसांनी (Lonavala City Police) सोमवारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन दुकानांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड केला, तर दोन दुकान मालकांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली असल्याची माहिती लोणावळा शहरचे (Lonavala News) पोलीस निरीक्षक दिलीप पवार (Police Inspector Dilip Pawar) यांनी दिली.

कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. अद्यापही बाधितांच्या चढ उतर होत आहेत.
त्यातच तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आल्यामुळे प्रशासनाने अस्थापनांसाठी काही
निर्बंध लागू केलेले आहेत. असे असताना ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवल्याचे समोर आले.
त्यामुळे अशा दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली.
असून यामध्ये प्रकरणी मनोज रामशंकर जयस्वाल यांचे रामशंकर चना डेपो व राकेश झवेरचंद पोरवाल यांचे पोरवाल कलेक्शन या दोन्ही दुकानांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे दंड केला.
सोबतच रोहित रामदास भालेसाईन यांचे मोरे वडेवाले व शांताराम गणपत मोरे यांचे
आकाश टी स्टाॅल या दोघांवर दुकाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ चालू ठेवल्याप्रकरणी
भादंवी कलम १८८, २६९ व साथरोग नियंत्रण कायदा कलम १८९७ चे कलम
कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Lonavala News | a fine of rs 20000 was imposed on two shops for violating corona rules in lonavala city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

786 Serial Number | जर तुमच्याकडे असेल 10 रुपयांची 786 नंबरची ही नोट? तर घरबसल्या कमावू शकता 5 लाख रुपये- जाणून घ्या कसे

Pune Crime | सुपारी देणार्‍या विवेक यादवची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची; जाणून घ्या बबलू गवळी अन् यादवमधील वैमनस्य

Healthy Kidney | किडनी खराब होण्यापासून वाचवतात ‘या’ 5 गोष्टी, आजपासूनच सुरू करा सेवन; होतील अनेक फायदे