Lonikand Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lonikand Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात (Forced Abortion) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) परराज्यातील 22 वर्षाच्या तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत वाघोली येथे घडला आहे.

याबाबत 15 वर्षाच्या पिडीत मुलीने शुक्रवारी (दि.14) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अमित कुमार गोस्वामी Amit Kumar Goswami (वय-22 रा. पुसोल जि. कैमुर, बिहार) याच्यावर आयपीसी 376/2/ए, 323, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत ओळख करुन तिच्यासोबत मैत्री केली. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

आरोपी अमित गोस्वामी याने पिडीत मुलीच्या राहत्या घरी जाऊन ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिली. तिने याबाबत अमित याला सांगितले. त्याने मुलीला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास देऊन तिचा गर्भपात केला. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर तुझी बदनामी करेन अशी धमकी देऊ मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोनाली भदे (PSI Monali Bhade) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP On Maharashtra Assembly Election | विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार का?, अजितदादांच्या आमदाराचं सूचक वक्तव्य

Viman Nagar Pune Crime News | पुणे : विरोधकाला मदत करतो का? ज्येष्ठ नागरिकाला मारहाण, सराईत गुन्हेगार गजाआड

New Platforms In Pune Railway Station | पुणे रेल्वे स्थानकात नव्याने 4 प्लॅटफॉर्म उभारले जाणार; वाढती गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना