Lust Stories 2 | लस्ट स्टोरीज् 2 मधील अंगद बेदीच्या बोल्ड सीनवर काय़ म्हणाली पत्नी नेहा धूपिया?

पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘लस्ट स्टोरीज् 2’ (Lust Stories 2) चित्रपट प्रेक्षकांना भावला होता. नेटफिक्सवर प्रदर्शित करण्यात आलेल्या या ‘लस्ट स्टोरीज् 2’ या ओटीटी चित्रपटामध्ये अनेक जोड्यांचा रोमांस बघायला मिळाला. यामध्ये नेहा धुपियाचा (Neha Dhupia) पती व अभिनेता अंगद बेदी (Angad Bedi) हा देखील मुख्य भूमिका साकारत होता. या चित्रपटामध्ये (Lust Stories 2) अंगद व अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांचा रोमांस दाखवण्यात आला होता.


https://www.instagram.com/p/CuYvZlOszAJ/?igshid=MzRlODBiNWFlZA==

‘लस्ट स्टोरीज् 2’ मध्ये नेहा धुपियाचा पती अंगद बेदी ऑनस्क्रीन रोमांस करताना दिसला होता. त्याचे व मृणालचे अनेक इंटिमेट सीन (Intimate Scene Lust Stories 2) दाखवण्यात आले होते. अंगद हा विवाहित असल्याने त्याच्या या भूमिकेबाबत त्याची पत्नी नेहा धूपिया (Neha Dhupia Husband) हिची काय प्रतिक्रिया होती याबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आला. तसेच भूमिकेबद्दल पहिल्यांदा सांगितले तेव्हा तिची काय रिॲक्शन होती असे विचारले असता त्याने सांगितले की, तिला या भूमिकेसाठी खूप आनंद झाला. ती खूप आनंदी होती. चित्रपटातील माझ्या भूमिकेबद्दल नेहा सकारात्मक होती असे उत्तर अंगद बेदी याने दिले आहे.

https://www.instagram.com/p/Ctx_urpoVQv/?igshid=MzRlODBiNWFlZA==

https://www.instagram.com/p/Cr-cfxvo1SV/?igshid=MzRlODBiNWFlZA==

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अंगदने बोल्ड सीन (Bold Scene) शुट करताना सेट वरील वातारवरणाबद्दल सांगितले. तो म्हणाला की, अशा बोल्ड कथा किंवा दृश्ये पाहिल्यावर प्रेक्षकांचा एक वेगळा दृष्टीकोन तयार होतो. असे सीन शूट करण्यासाठी आधी एक इंटिमसी कोच आणि निर्मात्यांकडून (Lust Stories 2) एक-दोन लोक असतात. बाकीच्या लोकांना त्या खोलीतून किंवा सेटच्या बाहेर पाठवले जाते, जेणेकरून कोणालाही अनकंफर्टेबल वाटणार नाही,” असं अंगदने स्पष्टपणे सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/CkFnZ8DgPNw/?igshid=MzRlODBiNWFlZA==

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Sunil Kendrekar | ‘…तर सुनील केंद्रेकरांवर गुन्हा दाखल करा’,
संजय शिरसाट यांची मागणी