IAS Sunil Kendrekar | ‘…तर सुनील केंद्रेकरांवर गुन्हा दाखल करा’, संजय शिरसाट यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शेतकरी आत्महत्येचा (Farmer Suicide) विषय चिंतेचा बनला आहे. या आत्महत्या थांबवण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सनील केंद्रेकर (IAS Sunil Kendrekar) यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील दहा लाख शेतकऱ्यांचा एक सर्व्हेक्षण केले होते. त्यामध्ये एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार सुरु असल्याचा अहवाल सरकारला दिला आहे. याचे पडसात पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) उमटताना पाहायला मिळत आहे. यावरुन शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. जर हा अहवाल खोटा ठरला तर सुनील केंद्रेकर (IAS Sunil Kendrekar) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला पाहिजे, असे शिरसाट म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, अत्यंत चुकीचा रिपोर्ट सुनील केंद्रेकर (IAS Sunil Kendrekar) यांनी काढला आहे. त्यांनी जो अहवाल दिला आहे, त्यावर संताप डोक्यात गेलेला आहे. या अहवालाची चौकशी करा, जर तो खरा असेल त्यानुसार कारवाई केली पाहिजे. जर तो चुकीचा असेल, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारा हा रिपोर्ट असेल तर केंद्रेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांकडे कालच याबाबत मागणी केली असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली.

शिरसाट पुढे म्हणाले, विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) म्हणून तुमची काही जबाबदारी नव्हती का?,
नोकरी गेल्यावर पोपटासारखे काय बोलता? शेतकरी उभा कसा राहील, याकडे लक्ष द्या, शेतकरी आत्महत्या कसे करतात
याकडे तुमचे लक्ष आहे का?असे शिरसाट म्हणाले. तुमची राजकीय व्यक्तीसारखे स्टेटमेंट आणि अहवाल देतायत.
त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. अहवाल खोटा असेल तर निश्चित गुन्हा दाखल केला जाईल.
सुनील केंद्रेकर यांच्याविरोधात ईडीची चौकशी (ED Inquiry) सुरु असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lavasa | ‘लवासा’ हिल स्टेशन विकण्यास NCLT ची मंजुरी, देशातील पहिल्या खासगी हिल स्टेशनची 1814 कोटींना विक्री