Madhuri Dixit | खलनायक चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी माधुरी दीक्षितकडून लग्नाआधीच ‘नो प्रेग्नेंसी क्लॉज’ घेतला लिहून

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही आजही ‘लाखो दिलों की धडकन’ आहे. मनोरंजन विश्वात अनेक दशके स्वतंत्र जागा निर्माण करणारी माधुरी आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. माधुरीचा (Madhuri Dixit) मोठा चाहता वर्ग असून तिच्या एका स्मितहास्यावर सगळे घायाळ होतात. माधुरीने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे पण तिच्याकडून एका दिग्दर्शकाने लग्नाआधीच ‘नो प्रेग्नेंसी क्लॉज’ लिहून घेतला आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या अभिनयाची मोहिनी प्रेक्षकांवर घातली आहे. अनेक पिढ्यांचे निखळ मनोरंजन करणारी माधुरी नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिचे चित्रपट (Madhuri Dixit Hit Movies), वैयक्तिक आयुष्य व लव अफेअर सगळ्यांच्या गोष्टींच्या खूप चर्चा रंगल्या आहेत. याचमुळे तिला अनेक गोष्टींना सामोरे देखील जावे लागले आहे. तिच्या अफेअरमुळे (Madhuri Love affair) माधुरीकडून लग्नाआधीच डायरेक्टरने ‘नो प्रेग्नेंसी क्लॉज’ साईन करुन घेतला होता. याचा अर्थ असा की ती चित्रपटाच्या शुटिंग पूर्ण होईपर्यंत माधुरी दीक्षित प्रेगेन्ट होऊ शकत नाही असा होतो.

https://www.instagram.com/p/CsDK4P0SomJ/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CqgGyq_v5mP/?igshid=MzRlODBiNWFlZA==

बी – टाऊन मध्ये एकेकाळचे सर्वांत फेमस कपल म्हणजे माधुरी दीक्षित व अभिनेता संजय दत्त हे होते.
त्याचे लव अफेअरच्या चर्चा सर्वत्र होत होत्या. दरम्यान या दोघांनी ‘खलनायक’ चित्रपटातील (Khalnayak Movie) भूमिका स्वीकारल्या होत्या. ‘खलनायक’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई (Director Subhash Ghai) यांनी माधुरी दीक्षित कडून ‘नो प्रेग्नेंसी क्लॉज’ (No Pregnancy Clause) साईन करुन घेतला होता. संजय दत्त व माधुरी दीक्षित यांच्यामधील जवळीकीचा परिणाम चित्रपटावर होत होता. यामुळे त्यांनी माधुरीचे लग्न झाले नव्हते तरी तिच्याकडून ‘नो प्रेग्नेंसी क्लॉज’ स्वाक्षरी करुन घेतला होता. पण पुढे माधुरी व संजयचे नाते संपुष्टात आले.

https://www.instagram.com/p/CnRyBuSSPkr/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/ClYeT6rMYva/?igshid=MzRlODBiNWFlZA==

माधुरीचे दीक्षित व संजय दत्त (Madhuri Dixit And Sanjay Dutt Affair) यांचे अफेअर खूप गाजले होते.
मात्र संजय दत्त यांचे नाव जसे मुंबईतील बॉम्बस्फोटमध्ये येऊ लागले तसे माधुरीने (Madhuri Dixit) संजयपासून
लांब राहण्यास सुरुवात केली. नंतर माधुरीने श्रीराम नेणे (Shriram Nene) यांच्यासोबत संसार थाटला.
आता माधुरी (Madhuri Dixit) व श्रीराम दोन मुलांचा सांभाळ करत आहे.

Electricity Connections In Pune | नवीन वीजजोडणी, नादुरुस्त मीटर बदलासाठी मीटरचा तुटवडा नाही