10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं (Maha SCERT) दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी वेबिनारचं आयोजन केलं आहे. १६ जूनपासून या वेबिनारला सुरुवात झाली आहे. हे वेबिनार महाराष्ट्र सरकारच्या SCERT YouTube Channel वरुन प्रसारित केलं जाणार आहे. या वेबिनार सिरीजमध्ये घेण्यात येणाऱ्या विषयांची यादी परिषदेनं जाहीर केली आहे. ज्यात इच्छुक विद्यार्थी भाग घेऊ शकतात आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही घेऊ शकतात.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

तसेच, सदर वेळापत्रक आपल्या संपर्कातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत शेअर करण्यासही सांगितलं आहे. महाराष्ट्र राज्य संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार, करिअर मार्गदर्शनासंदर्भात सेशन जॉईन करण्यासाठी संबंधित माहिती विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरुन मिळेल, असं आवाहनही संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे SCERT यांनी केलं आहे.

दरम्यान, यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनीही ट्वीट करुन माहिती दिली आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये या वेबिनारचं संपूर्ण वेळापत्रकही शेअर केलं आहे. वर्षा गायकवाड ट्वीटमध्ये विद्यार्थ्यांना आवाहन करताना म्हणाल्या की, “इ. 10वी व इ. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर विविध विषयांवरील विशेष वेबिनार आजपासून सुरू होत आहेत. @scertmaha मार्फत सुरु करण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने सहभाग व्हा.”
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : maharashtra to conduct webinars to provide career guidance to class 10 12 students

हे देखील वाचा

Pune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून एकाला अटक

Swargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी

Union Minister Raosaheb Danve । संजय राऊतांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं’

Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा नवा खुलासा; म्हणाले – ‘त्या’ दिवशी अजित पवारांचा फोन आला होता पण..

आई अन् मुलाचा खून ‘त्या’ने केल्याचा संशय बळावला

Pune Crime News | आयान अन् आलियाच्या खुनाचे गुढ ‘गडद’च, पण सीसीटीव्हीत आबिद कैद; पोलिसांकडून युध्दपातळीवर तपास सुरू