पोलीसनामा ऑनलाइन टीम – फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुदर्शीला महाशिवरात्री साजरी केली जाते. हिंदू धर्मानुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लग्न झाले. यावर्षी ११ मार्चला महाशिवरात्री सन साजरा होईल. महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शिवरात्रीचा दिवस महत्वाचा मानला जातो.
जोतिषांच्या म्हणण्यानुसार, यंदा पंचक दरम्यान महाशिवरात्रीचा सन साजरा होईल. या पाच नक्षत्रांच्या संयोजनात घनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती ही पंचक असतात. पंचक काळ हा ज्योतिषात शुभ मानला जात नाही.
पंचक केव्हा लागते ?
पंचक तेव्हाच लागते जेव्हा केंद्र कुंभ आणि मिन यांच्यामध्ये संक्रमण करतो. पंचक दरम्यान काही खास विधी शास्त्रात निषिद्ध मानल्या जातात. म्हणजेच जर महाशिवरात्रीच्या शुभ सणांनिमित्त पंचक येत असेल तर काही कामे यावेळी करू नयेत.
पंचक कितीपर्यंत ?
पंचक ११ मार्च गुरुवारी सकाळी ९.२१ वाजता सुरु होईल आणि मंगळवारी १६ मार्च रोजी सकाळी ४.४४ वाजता संपेल.
पंचकात काय करावे आणि काय करू नये ?
शास्त्रानुसार पंचकात दक्षिणेकडे जाणे निषिद्ध मानले जाते. या दिशेने प्रवास केल्यास मोठे नुकसान होऊ शकते. तसेच लाकडी वस्तू विकत घेऊ नये, यादिवशी लाकडी वस्तू घेणे टाळावे.