Mahadev Jankar On Ajit Pawar | महादेव जानकर म्हणाले अजित पवार भाXX माणूस, चूक लक्षात येताच केली सारवासारव

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Mahadev Jankar On Ajit Pawar | राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीत (Mahayuti) परतले असून ते माहायुतीचे परभणी लोकसभेचे (Parbhani Lok Sabha) उमेदवार आहेत. जानकर सध्या परभणी मतदारसंघात स्वत:चा प्रचार करत आहेत. तसेच ते इतर मतदारसंघात जाऊन महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. जनकरांचे प्रामुख्याने बारामती लोकसभा मतदारसंघात जास्त लक्ष आहे (Baramati Lok Sabha). या मतदारसंघात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारात जानकर सर्वात आघाडीवर आहेत.

महादेव जानकर यांनी बारामतीकरांना आवाहन केलं आहे की, त्यांनी सुनेत्रा पवारांना भरपूर मतं देऊन खासदार करावं. मी देखील परभणीतून खासदार होऊन संसदेत जाणार आहे. मी भावी मंत्री म्हणून सांगतोय. आम्ही लोकसभेत गेल्यावर दिल्लीतून बारामतीसाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणू, असे आश्वासन महादेव जानकरांनी दिले.

दरम्यान, बारामतीतल्या प्रचारसभेत अजित पवारांचे कौतुक करताना महादेव जानकर चुकल्याचे पहायला मिळाल. अजित पवारांना भाबडा माणूस म्हणताना जानकर चुकले. मात्र, आपली चुक लक्षात येताच महादेव जानकरांनी चुक लगेच सुधारली.

काय म्हणाले जानकर?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर प्रेम केलं.
मला उमेदवारी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर अवघ्या 15 दिवसांत माझ्या प्रचाराला मतदारसंघात आले.
मित्रांनो, बारामतीकरांनो माझी तुम्हाला विनंती आहे की ही जागा आपल्याला मिळाली पाहिजे.
या जागेवर आपला उमेदवार जिंकला पाहिजे. बांधवांनो सुनेत्रा वहिनी बारामतीतून जिंकल्या पाहिजेत.
अजित पवार हा तर खूप मनमोकळा माणूस आहे. अजित पवार हा भामटा माणूस… भाबडा माणूस आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress Bhavan | महिला सुरक्षेसाठी मोदी सरकार हटवावेच लागेल; सामाजिक संस्थांच्या महिला कार्यकर्त्यांचे मत